esakal | रोहित जैसा कोई नहीं; टपोरी लँगवेज ते विसराळूपणाचे किस्से

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma
रोहित जैसा कोई नहीं; टपोरी लँगवेज ते विसराळूपणाचे किस्से
sakal_logo
By
सुशांत जाधव

ज्याच्या शतकासाठी देव पाण्यात ठेवले जायचे त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघासोबत वनडेतील पहिले वहिले आणि एकमेव द्विशतक झळकावले. क्रिकेटच्या देवाने सांगितलेली भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करुन दाखवली.

क्रिकेट मैदानात सेट झालेला बॅट्समन जेव्हा फिफ्टी क्रॉस करुन 70-80 च्या घरात खेळत असतो त्यावेळी त्यानं शतक करावे, अशी इच्छा त्याच्या डाय हर्ट फॅनची नक्कीच असते. पण मैदानात उतरल्यावर द्विशतक करेल, अशी भावना ज्याच्याबद्दल सहज निर्माण होते ते क्रिकेट जगतातील एकमेव नाव म्हणजे रोहित शर्मा. ज्याच्या शतकासाठी देव पाण्यात ठेवले जायचे त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघासोबत वनडेतील पहिले वहिले आणि एकमेव द्विशतक झळकावले. वनडेतील पहिल्या द्विशतकवीराला एका कार्यक्रमामध्ये दुसरे द्विशतक कोण करेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी विरेंद्र सेहवाग, विराट कोहली ही मंडळी चांगलीच फार्मात होती. मास्टर ब्लास्टरनं सेहवागच नाव घेतलं असतं तर कुणालाच आश्चर्य वाटले नसते. मात्र क्रिकेटच्या देवानं नाव घेतलं ते रोहितच.

हेही वाचा: IPL 2021 : मोदी स्टेडियमवर दिल्लीकरांचा रुबाब!

वनडेतील पहिल्या द्विशतकाला तीन वर्षे उलटल्यानंतर क्रिकेटच्या मैदानातील देवानं केलेली भविष्यवाणी खरी ठरली. रोहित शर्माने बंगळुरुच्या मैदानात कांगारुंच्या विरुद्ध वनडो कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. 2014 मध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांची त्याने यथेच्छ धुलाई केली. ईडन गार्डनच्या मैदानात मॅथ्यूच्या चेंडूवर दोन धावा घेत संघाचे आणि आपले खाते उघडणारा रोहित शेवटच्या चेंडूवर कुलेशकराच्या चेंडूवर कॅच आउट झाला. या सामन्यात त्याने केलेल्या 264 धावा ही वनडेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. 2017 मध्ये मोहालीच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध पुन्हा त्याने द्विशतकी माहोल निर्माण करुन कल्ला केला आणि वनडेत सर्वाधिक वेळा द्विशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

हेही वाचा: MIvsRR : मुंबई जिंकली; रितिकावर फिरला कॅमेरा (VIDEO)

रोहित सेट झाल्यावर धुरंधर गोलंदाजही ही टप्पा कुठ टाकायचं ते विसरुन जातो. हे जरी खरं असले तरी विसरण्याच्या बाबतीत रोहितचा हात कोणी धरु शकणार नाही. आयपॅड, फोन यासारख्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूही विसरतो. एवढेच काय परदेशी वारीवर अनेकदा तो पासपोर्ड विसरुन एअरपोर्टवर पोहचल्याचा किस्साही घडलाय. भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने आपला सहकाही रोहितच्या विसराळूपणाचा किस्सा एका कार्यक्रमात शेअर केला होता. रोहित बेफ्रिक्रे आहे त्याला जर तुम्ही विचारले आयपॉड कुठेय तर तो म्हणतो ठिक आहे दुसरा घेऊया. मुळात तो ती गोष्ट विसरलेली असतो. त्यानंतरही तो बिनधास्त दिसतो, असे कोहलीने सांगितले होते. दोन तीन वेळा तर रोहित शर्मा चक्क पासपोर्ट विसरला होता. तेव्हापासून लॉजिस्टिक मॅनेजर बसमध्ये बसल्यानंतर पहिल्यांदा रोहितने सर्व सामना घेतले आहे का? हा प्रश्न विचारतो आणि मगच आमची बस सुटते, असा किस्सा सांगितला होता. याच कार्यक्रमात कोहलीने हिटमॅनच्या टपोरी लँगवेजचा किस्साही शेअर केला होता. रोहित एखादी गोष्ट सांगताना टपोरी लँगवेजचा वापर करतो. जर त्याला लोखंडवालामध्ये ट्रॅफिक आहे हे सांगायचे असेल तर तो आरे 'वहॉ ना बहुते ये है... म्हणजे कुठे काय आहे हे तुम्हाला समजून घ्यावे लागते.