उत्तर भारतातील पैलवान शाकाहारी का असतात?

धांडोळा : मल्लांच्या खुराकाचा...
Wrestler Diet
Wrestler DietSakal

काही खेळ माईंड गेम म्हणून ओळखले जातात तर काही खेळ पॉवर गेम असतात. पण कुस्ती (Wrestling) या खेळात शक्ती आणि युक्ती या दोन्हींचा संगम पाहायला मिळतो. ऑलिंपिक मध्ये कोल्हापूरचे मल्ल खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांनी पहिले पदक जिंकत भारताची ऑलिंपिकची कवाडे खुली केली. कुस्ती म्हटले की त्यांचे अतरंगी डाव आणि खुराक (Wrestler Diet) याची कायम चर्चा असते. मल्ल खूप खातात असाच सगळ्यांचा समज आहे. हा समज काही अंशी खरा असला तरी त्यांचा खुराक नियमामध्ये बांधलेला असतो. आज आपण याचाच धांडोळा घेणार आहोत. पारंपरिक आणि आधुनिक असे दोन प्रवाह कुस्तीमध्ये पाहायला मिळतात. अर्थात मातीवरील आणि मॅटवरील अशा दोन्ही प्रकारात आहाराचा आकृतीबंध बदलतो.

शारीरिक रग लागणाऱ्या कुस्तीचा भरगच्च आहार

पारंपरिक कुस्ती ही मातीवर खेळी खेळली जाते. या कुस्तीला वेळेची, वजनी गटाची कुठलीही मर्यादा नसते. जोपर्यंत मल्ल चितपट होत नाही तोपर्यंत लढत सुटत नसते. कधी पाच मिनिटे लागतात तर कधी तास उलटून गेला तरी खेळ सुरूच असतो अशावेळी मल्लच्या आहारात त्यानुसार बदल केले जातात मातीतील खेळणारे मल्ल यांचा आहार तुलनेनं जास्त आणि शारीरिक क्षमता विस्तारणारा असतो.

Wrestler Diet
महिला अन् कुस्ती हे समीकरण समाजाला मान्य नव्हतं, पण...

मॅटवरील कुस्तीपटूचा मापात आहार

मॅटवर कुस्ती खेळणारे कुस्तीपटू यांचा खेळ नियमांमध्ये बांधलेला असतो गुणांकन पद्धतीमुळे फारतर पाच मिनिटं पर्यंत खेळ रंगतो त्यापेक्षा अधिक काळ शक्यतो ही कुस्ती चालत नाही. तसेच वजनी गटात असल्याने वजन जास्त भरू नये याचीही दक्षता पैलवानांना घ्यावी लागते. त्यामुळे आहारही ठराविक असतो. त्यामुळे मॅटवरील मल्लांचा आहार मातीवरील कुस्तीपटूशी काहीसा मिळता-जूळता असला तरी ऐन लढतीच्यावेळी अनेक कुस्तीपटू फक्त फळांची सरबते घेणं पसंत करतात.

दृष्टिक्षेप आहाराचा यादीवर...

मल्लांना आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन ची मात्रा घ्यावी लागते त्यामुळे दूध पनीर मटन चिकन अंडी विविध प्रकारच्या डाळी, तूप, थंडाई सुकामेवा असा साचेबद्ध आहार घ्यावा लागतो. बहुतेक भाज्या या तूपातच केलेल्या असतात अक्रोड आणि बदामाची थंडाई सर्वच पैलवानसाठी आवश्यक असते.

उत्तर भारतीय बहुतांश मल्ल शाकाहारीच का ?

पैलवान म्हंटलं की त्याचा खुराक मांसाहारी असणार असं गृहीत धरलं जातं मात्र उत्तर भारतातले जवळपास 85 टक्के मल्ल हे शाकाहारावरच भर देतात. यावर रुस्तम ए हिंद किताबाचे मानकरी ठरलेले अमोल बुचडे यांनी अधिक प्रकाश टाकला. ते सांगतात डबल ओलंपिक पदक विजेता सुशील कुमार याचा आहार शाकाहारच आहे. एवढेच नाही तर कुस्तीमध्ये ज्यांना दैवत मानला जाते ते अगदी सुरुवातीच्या काळातले गुरु हनुमान यांनी शाकाहार घेतच कुस्तीचा पाया रचला. याखेरीज अनेक मल्ल शाकाहार यावरच भर देताना दिसतात. अमोल बुचडे यांनी अधिक प्रकाश टाकला. ते सांगतात महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तरेकडे हवामान काहीसे संतुलित असते. टोकाचा उकाडा तिथे फारसा अनुभवायला मिळत नाही. मांसाहारातून मिळणाऱ्या प्रोटीनची कमतरता कडधान्ये, दूध, लस्सी, पनीर आणि थंडाई यातून भरून काढली जाते. यामुळेच कदाचित चाळीशी उलटली तरी महाराष्ट्रातील पैलवनच्या तुलनेत उत्तरेतील पैलवान मैदानात कुस्ती खेळताना दिसतो.

Wrestler Diet
'अजिंक्य रहाणेने अनुभवाच्या जोरावर संघात स्थान मिळवले खरे पण...'

नुसतं पाणी पिऊन जिंकली पदकं...

म्हाऴुंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंकुलात आठ वर्षापुर्वी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. विविध राज्यातील कुस्तीपटु डेरेदाखल झाले होते. मात्र, त्यांच्या जेवणाची व्यवस्थाच नीट कऱण्यात आली नव्हती. अशातच दुस-या दिवसापासुन वजनी गटाच्या लढती सुरु झाल्या. अनेक मल्लांना त्यादिवशी दुधही मिळाले नाही.अशातच रिकाम्यापोटी मल्लांनी पदकं जिंकली.बघता बघता ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पोहोचली. महराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर सर्व स्तरातुन एकच टीकेची झोड उठली. यानंतर मात्र, परिषदेच्यावतीनं मल्लांची चांगली बडदास्त राखली गेली, सांगायचा मुद्दा एवढाच की कुस्तीच्या विकासाचा वसा घेणा-या कुस्तीगीर परिषदेकडुनही कुस्तीपटु आणि त्यांच्या आहाराबाबत एवढा हलगर्जीपणा घडला. काळानुरुप कुस्तीमध्ये आहारामध्ये बदल घडत गेले. मात्र, बदलला नाही तो कुस्तीचा लढवय्या बाणा. परदेशातल्या कुस्तीपटुंपुढे आपले मल्ल वरकरणी खुजे दिसले तरी रिकाम्या पोटीही विजयाश्री खेचुन आणण्याचा जिंगरा आपल्याकडे आहे हेच खरे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com