लेडिज फर्स्ट; पुरुषांच्या आधी महिलांनी खेळलीये वर्ल्ड कप स्पर्धा

women world cup older tournament than men world cup
women world cup older tournament than men world cupSakal

जगभराच्या तुलनेत भारतात क्रिकेटची तुफान लोकप्रियता आहे. सध्याच्या घडीला यात पुरुष क्रिकेट आघाडीवर आहे. पण तुम्हाला माहितीये का? महिला वर्ल्ड कप स्पर्धा (Womens Cricket World Cup) ही पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेपेक्षाही जुनी आहे. क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा महिला वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 1973 मध्ये महिला वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्यानतंर दोन वर्षांनी पुरुषांची वर्ल्ड कप स्पर्धा (Mens World Cup) झाली. भारतीय महिला संघाने पहिला वर्ल्ड कप हा 1978 मध्ये खेळला. विशेष म्हणजे या स्पर्धेचे यजमानपदही भारतानेच भुषवले होते. यावेळी भारतीय महिला संघ चौथ्या स्थानावर राहिला. आतापर्यंत 11 वर्ल्ड कप स्पर्धेतील 9 स्पर्धेत भारतीय महिला संघ सहभागी झाला आहे.

भारतीय संघाने 2005 आणि 2017 मध्ये फायनलही खेळली आहे. परंतु 44 वर्षानंतर आजही भारतीय संघ पहिल्या वहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे.मागील हंगामात भारत आणि इंग्लंड यांच्यात फायनल सामना रंगला होता. भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावण्याचा स्थितीत होता. पण अखेरच्या टप्प्यात गणित बिघडली. पहिला वर्ल्ड कप जिंकता जिंका राहून गेला.

women world cup older tournament than men world cup
ती गोष्ट कायम सलत राहील; वर्ल्ड कप आधी मितालीचं मोठ वक्तव्य

महिला वर्ल्ड कप स्पर्धेचा 49 वर्षांचा प्रवास

1973 मध्ये महिला वर्ल्ड कप स्पर्धा पहिल्यांदा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी सात संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या स्पर्धेत यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन पहिली ट्रॉफी उंचावली होती. इंग्लंडच्या व्यापाऱ्यांनी वर्ल्ड कपसाठी 40 हजार पाउंड देणगी दिली होती.

कोणी कितीवेळा जिंकली स्पर्धा

1978, 1983 आणि 1988 मध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने सलग तीन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम नोंदवला. 1993 मध्ये इंग्लंड महिलांनी पुन्हा कमबॅक केलं. 1997 आणि 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन महिलांनी चौथा आणि पाचव्यांदा ही स्पर्धा गाजवली. 2000 मध्ये न्यझीलंड महिलांनी बाजी मारली होती. 2009 इंग्लंड, 2013 पुन्हा ऑस्ट्रिलेया आणि 2017 पुन्हा इंग्लंड असे विजेते पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 6 वेळा इंग्लंड 4 वेळा तर न्यूझीलंडने 1 वेळा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली आहे.

women world cup older tournament than men world cup
अनसोल्ड रैनाची पोस्ट, कोणाला म्हणतोय 'फायर हैं मैं'

भारतीय संघाची प्रतिक्षा संपणार?

यंदाच्या वर्षी 12 व्या हंगामातील महिला वर्ल्ड कपचे आयोजन हे न्यूझीलंडमध्ये करण्यात आले आहे. 4 मार्चपासून या स्पर्धेला शुभारंभ होणार आहे. भारतीय संघ दहाव्यांदा या स्पर्धेत उतरणार आहे. मिताली राज आणि अनुभवी महिला पेसर झूलन गोस्वामी पाचव्यांदा वर्ल्ड कप खेळणार आहेत. 2005 आणि 2017 च्या हंगामातील कामगिरीच्या एक पाऊल पुढे जाऊन भारतीय महिला संघ पहिली वहिली ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com