Video : सुनंदन लेले जेव्हा पत्नीला पहिल्या प्रेमाबद्दल सांगतात

Video : सुनंदन लेले जेव्हा पत्नीला पहिल्या प्रेमाबद्दल सांगतात

प्रसिद्ध क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी नुकताच रानडे रीएलटर्स प्रस्तुत "इंसपायरिंग स्टोरीज" (Ranade Realtor's Presents 'Inspiring Stories' By Sakal) या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यांची हि संपूर्ण मुलाखत १ जून रोजी सकाळी ११ वाजता सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहता येणार आहे.

रानडे रीएलटर्स प्रस्तुत "इंसपायरिंग स्टोरीज" बाय सकाळ (Ranade Realtor's Presents 'Inspiring Stories' By Sakal) या कार्यक्रमात आपल्याला १ जूनपासून आपापल्या क्षेत्रात जगभरात कीर्ती मिळवणाऱ्या अनेक मान्यवरांचा प्रेरणादायी प्रवास आपल्याला या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). सुनंदन लेले (Sunandan Lele Full Interview) यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना पहिल्यांदाच सर्वांसमोर मांडल्या आहेत.

सुनंदन लेले जेव्हा पत्नीला पहिल्या प्रेमाबद्दल सांगतात :

आपल्या सर्वांना सुनंदन लेले (Sunandan Lele Full Interview) हे एक क्रीडा समीक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत क्रिकेट खेळाकरिता आपल्या लिखाणातून खूप मोठे योगदान दिले आहे. आपल्यातील अनेकांना सुनंदन लेले हे सुद्धा एक क्रिकेटर होते हि गोष्ट माहिती नसेल. सुनंदन लेले हे अंडर १९ चे कॅप्टन राहिलेले आहेत. ते एक उत्कृष्ट फलंदाज होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप क्रिकेट खेळले आहेत.

सुनंदन लेले यांच्या क्रिकेटची सुरवात ते लहान असताना पुण्यातील वाड्यामधूनच त्यांनी खेळायला सुरवात केली होती. त्यांनी त्यानंतर रमणबाग , पीवायसी कडून भरपूर क्रिकेट खेळले. आणि त्यांचे क्रिकेटचं प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच गेले.

Video : सुनंदन लेले जेव्हा पत्नीला पहिल्या प्रेमाबद्दल सांगतात
मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
Video : सुनंदन लेले जेव्हा पत्नीला पहिल्या प्रेमाबद्दल सांगतात
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताची मदत ठरणार कारणीभूत?

रानडे रीएलटर्स प्रस्तुत "इंसपायरिंग स्टोरीज" (Ranade Realtor's Presents 'Inspiring Stories' By Sakal) या कार्यक्रमात त्यांनी आपलं क्रिकेटशी असलेलं नातं पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर मांडलं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही घटना सांगत असताना त्यांच्या लग्नाची सुद्धा गोष्ट सकाळच्या प्रेक्षकांसाठी उलगडली. सुनंदन लेले यांनी त्यांच्या पत्नीला लग्नाच्या आधी तू माझी दुसरी बायको असून माझं पहिलं प्रेम माझी पहिली बायको हि क्रिकेटची बॅट असल्याचं सांगितलं होतं. जर तुला आयुष्यभर हि सवत म्हणून मान्य असेल तर तू माझ्याशी लग्नाला होकार कळव असं सांगितलं होतं. सुनंदन लेले यांच्या पत्नी यासुद्धा हॉकीपटू असल्याने त्यांनी सुद्धा सुनंदन लेले यांचे पहिले प्रेम स्वीकारून त्यांच्याशी विवाह केला असं सुनंदन लेले यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

आपल्याला १ जून रोजी सकाळी ११ वाजता सुनंदन लेले (Sunandan Lele Full Interview) यांची हि संपूर्ण मुलाखत (Ranade Realtor's Presents 'Inspiring Stories' By Sakal)सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार असून या मुलाखतीत अनेक माहिती नसलेल्या गोष्टी आपल्याला सुनंदन लेले यांच्याकडून ऐकायला मिळणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com