युवा ऑलिंपिक विजेत्या सौरभ चौधरीला रौप्य

सौरभ चौधरी
सौरभ चौधरी

मुंबई : आशियाई क्रीडा तसेच युवा ऑलिंपिक विजेत्या सौरभ चौधरीला आशियाई नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. एवढेच नव्हे तर सौरभचा अंतिम फेरीतील सर्वाधिक गुणांचा जागतिक विक्रम मोडत उत्तर कोरियाच्या किम सॉंग गुक याने सुवर्णपदक जिंकले.

सौरभ दोहातील ही स्पर्धा विसरणार नाही. त्याला सुवर्णपदक विजेत्या किमविरुद्ध दोनपेक्षा जास्त गुणांनी हार पत्करावी लागली. किमने 246.5 गुणांचा वेध घेताना सौरभचा अंतिम फेरीतील जागतिक विक्रम 0.2 गुणांनी मागे टाकला. सौरभने 244.5 गुणांची कमाई केली. सौरभ तसेच ऑलिंपिकची पात्रता यापूर्वीच मिळवलेला अभिषेक वर्मा यानेही अंतिम फेरी गाठली. पण तो पाचवा आला. त्याने 181.5 गुण मिळवले होते. सौरभ, अभिषेक आणि श्रवण कुमारने 1740 गुणांसह सांघिक ब्रॉंझ जिंकले.

कुमार गटातील सुवर्ण धडाका कायम आहे. श्रेया अगरवाल आणि धनुष श्रीकांतने दहा मीटर एअर रायफलच्या कुमार मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी निर्णायक फेरीत चीनच्या जोडीला 16-14 असे पराजित केले. हीच कामगिरी पुरुष ट्रॅप सांघिक स्पर्धेत झाली. या संघात गुरनिहाल गार्चा, अभय सिंग सेखॉन, आयुष रुद्राराजू यांचा या संघात समावेश होता. गुरनिहालने वैयक्तिक रौप्य जिंकले. पात्रतेत अव्वल आलेला अभय अंतिम फेरीत चौथा आला.

भारतीयांचा पदक वेध
- कुमारी स्कीट सांघिक स्पर्धेत रौप्य. चीनला सुवर्ण
- धालीवाल परिनाझ, अरीबा खान, कार्तिकी सिंग शेखावत यांचा एकत्रित 309 गुणांचा वेध
- दहा मीटर एअर पिस्तूल कुमार सांघिकमध्ये ब्रॉंझपदक
- सरबजोत सिंग, आकाश आणि युवराज सिंगची एकत्रित 1724 गुणांची कमाई
- तिघांचेही समान 568 गुण, अंतिम फेरीत आकाश पाचवा; तर सरबजोत सातवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com