esakal | युवीच्या स्वप्नाआड आला धोनी!
sakal

बोलून बातमी शोधा

yuvraj singh and dhoni

युवीच्या स्वप्नाआड आला धोनी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाला दोन वेळा विश्वविजेता बनवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या युवीने पहिल्यांदाच आपल्या मनातील मोठी खदखद बोलून दाखवलीये. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी माझ्याकडे येईल, असे वाटत होते. पण सिलेक्टर्संनी टी-20 वर्ल्ड कप संघाची धूरा महेंद्रसिंह धोनीच्या हाती सोपवली. या निर्णयाने टीम इंडियाचे नेतृत्व करण्याचे युवीचे स्पप्न उद्धवस्त झाले.

पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. या स्पर्धेत युवराज सिंगने टीम इंडियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. याच स्पर्धेत युवीने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये लागोपाठ सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता.

हेही वाचा: WTC Final : काय आहे विराट कोहली-शास्त्री गुरुजींची डोकेदुखी?

एका पॉडकास्ट कार्यक्रमात संवाद साधताना युवीने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.'तो म्हणाला की, टीम इंडियाने मर्यादित षटकांचा वर्ल्ड कप गमावला. याकाळात भारतीय संघात चांगलीच उलथा-पालथ झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडचा एक महिन्यांचा दौरा, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्यावरील महिन्याभराचा कार्यक्रम आणि एक महिन्याची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा असे चार महिने आम्हाला बाहेर खेळायचे होते. या व्यस्त कार्यक्रमात वरिष्ठ खेळाडूंनी टी-20 वर्ल्ड कपला सीरियसली घेतले नव्हते. वरिष्ठ खेळाडू टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार नसल्याने संघाचे नेतृत्व माझ्याकडे येईल, अशी आशा होती. पण यावेळी महेंद्रसिंह धोनीकडे नेतृत्व देण्यात आले.

हेही वाचा: WTC Final : सिराजला प्लेइंग XI मध्ये संधी, दिग्गजाला डच्चू?

यावेळी युवीने धोनीसोबतच्या नात्यावरही भाष्य केले. धोनीसोबत कोणतेही मतभेद नव्हते. ज्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाते त्याला सपोर्ट करणे आवश्यक असते. संघाच्या नेतृत्व कोणीही करत असले तरी तुम्हाला एक टीम मॅन म्हणून त्याकडे पाहावे लागते. मी तेच केले, असेही तो म्हणाला. युवीने पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कपच्या आठवणी सांगताना एक खास किस्साही शेअर केला. तो म्हणाला की, स्पर्धेतील पहिला सामन्यात वेस्ट इंडिजच्या गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 50 चेंडूत 55 धावा केल्या होत्या. यावेळी झहिर खानने स्पर्धेतून विश्रांती घेतली ते बरे झाले असा मेसेज केला होता. आम्ही विजेतेपद मिळवल्यानंतर त्याने मी ही खेळायला पाहिजे होते, असे बोलून दाखवल्याचा किस्साही शेअर केला.