World Cup 2019 : युवराज म्हणतो, हा कसला फालतू नियम?

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जुलै 2019

सुपर ओव्हरमध्ये सुद्धा सामना टाय झाला होता. मात्र, केवळ इंग्लंडने जास्त चौकार मारल्याने त्यांना विजेते घोषित करण्यात आले. त्यामुळे सामन्यानंतर युवराजने लगेचच ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, त्याआधी त्याने इंग्लंडला शुभेच्छाही दिल्या आहेत.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला. तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकात दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत सुटला. अखेर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा विजय झाला. मात्र, हा विजय वादग्रस्त ठरला आहे. या सामन्याचा निकाल लावणारा नियम मला मान्य नाही, असे भारताचा माजी फलंदाज युवराजसिंगने म्हटले आहे.

सुपर ओव्हरमध्ये सुद्धा सामना टाय झाला होता. मात्र, केवळ इंग्लंडने जास्त चौकार मारल्याने त्यांना विजेते घोषित करण्यात आले. त्यामुळे सामन्यानंतर युवराजने लगेचच ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, त्याआधी त्याने इंग्लंडला शुभेच्छाही दिल्या आहेत.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सुद्धा या मियमावर नाराजी व्यक्त केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvraj Singh and Gautam Gambhir slams ICC rules