Yuvraj Singh 6 Sixes Story
esakal
२००७ च्या टी-२० विश्वकप स्पर्धेतील भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना क्रिकेटचाहते आजही विसरलेले नाही. याच सामन्यात युवराज सिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सलग सहा षटकार लगावले होते. त्यावेळी हा सामना बघणारा प्रत्येक जण थक्क झाला होता. मात्र, त्या सामन्यानंतर एक मजेशीर किस्साही घडला होता. हा किस्सा युवराजने नुकताच एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितला आहे.