esakal | चहल म्हणतो, ये माही भाई की जगह है, आज भी यहाँ कोई नही बैठता
sakal

बोलून बातमी शोधा

cricket

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 ने संघाने आघाडी घेतलेली आहे. भारतीय संघ तिसऱ्या सामन्यासाठी हॅमिल्टन येथे पोहचला आहे. चहल हा नेहमी 'चहल टिव्ही'साठी व्हिडिओ करत असतो.

चहल म्हणतो, ये माही भाई की जगह है, आज भी यहाँ कोई नही बैठता

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हॅमिल्टन : मिस्टर कुल अशी ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी सध्या संघाबाहेर असला तरी संघातील एकही खेळाडू त्याची जागा घेण्यास धजावत नसल्याचे समोर आले आहे. अगदी संघाच्या बसमधील धोनीच्या जागेवरही कोणी बसत नसल्याचे युझवेंद्र चहलने केलेल्या व्हिडिओतून समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 ने संघाने आघाडी घेतलेली आहे. भारतीय संघ तिसऱ्या सामन्यासाठी हॅमिल्टन येथे पोहचला आहे. चहल हा नेहमी 'चहल टिव्ही'साठी व्हिडिओ करत असतो. असाच त्याचा एक व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या अधिकृत चॅनेलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून भारतीय संघाला अजूनही धोनीची आठवण येत असल्याचे दिसत आहे. धोनीने इंग्लंडमधील विश्वकरंडक स्पर्धेनंतर एकही सामना खेळलेला नाही.

चहलने केलेल्या व्हिडिओत भारतीय संघाच्या बसमधील ती जागा दाखविली आहे. त्यावर चहल म्हणतो, की ही ती जागा जिथे आमच्या संघातील दिग्गज बसत असे, माही भाई. आताही या जागेवर कोण बसत नाही. आम्ही त्यांना खूप मिस करतो. धोनीचे यापूर्वीही जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, रिषभ पंत, कुलदीप यादव आणि केएल राहुल यांच्यासोबतच्या संवादाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.