esakal | इंटरव्ह्युला जाताय? कंपनी कल्चर जाणून घेण्यासाठी विचारा १० प्रश्न

बोलून बातमी शोधा

इंटरव्ह्युला जाताय? कंपनी कल्चर जाणून घेण्यासाठी विचारा १० प्रश्न

 प्रश्न विचारतांना ते आदबीने  व आत्मविश्वासाने विचारा.

इंटरव्ह्युला जाताय? कंपनी कल्चर जाणून घेण्यासाठी विचारा १० प्रश्न
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोणत्याही ठिकाणी नोकरीला जाण्यापूर्वी मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू देणं गरजेचं असतं. इंटरव्ह्युच्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव, त्याचं कौशल्य आणि त्याचं व्यक्तीमत्व कसं आहे याचा अंदाज लावता येतो. त्यामुळे मुलाखतीला गेल्यावर अनेकदा मुलाखतकार मुलाखतदाराला वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. परंतु अनेकदा मुलाखतकाराने प्रश्न विचारल्यावर काही जण गांगरुन जातात आणि ज्या प्रश्नांची उत्तर येत असतात ते देखील चुकतात. विशेष म्हणजे मुलाखतकार कायमच मुलाखतदाराला कोड्या पाडणारे प्रश्न विचारत असतात. यावेळी गोंधळून न जाता आत्मविश्वासाने त्या प्रश्नांची उत्तरं द्या. खरंतर प्रत्येक मुलाखतीत मुलाखतकार प्रश्न विचारत असतात. परंतु, आपणदेखील कंपनीची माहिती होण्यासाठी प्रतिप्रश्न नक्कीच विचारु शकतो. मात्र, हे प्रश्न विचारतांना ते आदबीने व आत्मविश्वासाने विचारा. विशेष म्हणजे मुलाखतीसाठी गेल्यावर कंपनीविषयी कोणते प्रश्न विचारावेत हे जाणून घेऊयात.

१. कंपनीविषयी थोडक्यात -
कोणत्याही ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्युला जाण्यापूर्वी त्या कंपनीविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती असणं गरेजचं आहे.  याच माहितीच्या आधारे तुम्ही कंपनीविषयी मुलाखत अन्य काही गोष्टी असतील तर त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करु शकता.यातून तुम्हाला कंपनीविषयी वाटणारी आत्मियता दिसून येईल.

२. कंपनीची पॉलिसी -
प्रत्येक कंपनीची वेगवेगळी पॉलिसी असते. त्यामुळे त्या कंपनीची पॉलिसी नेमकी कशी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सुट्ट्यांविषयी, मॅनेजमेंट, इन्शुरन्स पॉलिसी याविषयी माहिती करुन घ्या.

३. कंपनीच्या यशाचा आलेख -
प्रत्येक कंपनीचं एक ध्येय असतं. त्यामुळे कंपनीने ठेवलेलं ध्येय आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना लागलेला कालावधी किंवा त्यांनी संपादन केलेलं अखेरचं यश कोणतं ते नक्की विचारा. तसंच यश मिळाल्यानंतर ते कशा स्वरुपात साजरं केलं जातंही हेदेखील आवर्जुन विचारा.

४. ड्रेस कोड -
खरंतर फार मोजक्या कंपन्यांमध्ये ड्रेस कोड ठेवण्यात आलेला असतो. त्यामुळे तुम्ही ज्या कंपनीमध्ये इंटव्ह्यू देताय त्या कंपनीचा ड्रेस कोड आहे का हे नक्की विचारा. तसंच एक कर्मचारी म्हणून तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणत्या सोयीसुविधा मिळतील तेदेखील विचारा.

५. कर्मचाऱ्यांसाठी काही उपक्रम राबवले जातात का?
अनेक कंपन्यांमध्ये दोन किंवा तीन महिन्यातून कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी केली जाते किंवा कंपनीतील कर्मचाऱ्यांमधील बॉंडिंग चांगलं व्हावं यासाठी छोटेखानी पिकनिक, कार्यक्रम याचं आयोजन केलं जातं. त्यामुळे कंपनीत असे कोणकोणते उपक्रम राबवले जातात ते विचारा.

६. मागील वर्षातील सर्वात मोठं आव्हान आणि ते हाताळण्याची पद्धत -
एखादी कंपनी चालवत असताना अनेक मोठे चढउतार येतच असतात. त्यामुळे कंपनीला आतापर्यंत आलेलं सर्वात मोठं आव्हान किंवा ते त्यांनी कशाप्रकारे हाताळलं हे नक्की विचारा. 

७.  कामाची वेळ -
सर्वसाधारणपणे कोणत्याही कंपनीमध्ये कामाची वेळ ही ८ तासांचीच असते.  तसंच काही कंपन्यांमध्ये शिफ्टप्रमाणे काम करावं लागतं. त्यामुळे तुम्ही जात असलेल्या कंपनीच्या कामाची वेळ, तास, शिफ्ट सविस्तर विचारुन घ्या. तसंच कंपनीच्या बॉसची आणि कर्मचारी यांच्यातील बॉण्डिंग कशी आहे याचाही आढावा घ्या.

हेही वाचा : मोदी सरकार देणार दीडशे कोटी जणांना रोजगार? जाणून घ्या सत्य

८. कंपनीच्या यशाची व्याख्या काय?
प्रत्येक व्यक्तीच्या यशाची एक व्याख्या असते. त्यानुसार, व्यक्ती काम करत असतात. तसंच कंपनीच्या बाबतीतही असतं. त्यामुळे कंपनीची मूळ तत्वे कोणती, टीमच्या कामाची पद्धत हे सारं विचारा.

९. सुट्ट्यांचं व्यवस्थापन -
कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्या किती आहेत किंवा कोणत्या स्वरुपाच्या सुट्ट्या मिळतात हे नक्की विचारुन घ्या.

१०.  ऑफिस पाहणे -
कोणत्याही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तेथील वातावरण कसं आहे, कर्मचारी कसे आहेत हे नक्की जाणून घ्या. त्यामुळे इंटरव्ह्युला गेल्यावर तेथील ऑफिस पाहण्याची परवानगी मिळेल का हे आवर्जुन विचारा.