मोदी सरकार देणार दीडशे कोटी जणांना रोजगार? जाणून घ्या सत्य

मोदी सरकार देणार दीडशे कोटी जणांना रोजगार? जाणून घ्या सत्य

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता एकिकडे नागरिक हवालदिल होत आहेत. तर, दुसरीकडे प्रशासन मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये सोशल मीडियावर दररोज नवनवीन अफवा पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यात पंतप्रधान मोदी यांनी दीडशे कोटी जणांना रोजगार दिल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, ही अफवा असून सत्य समोर आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच देशातील बेरोजगारी हटवण्याविषयी आणि तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याविषयी वक्तव्य करत असतात. त्यामुळे लॉकडाउनच्या काळातही मोदींनी असाच एक दावा केल्याचं वृत्त सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं. सोबतच आजतक या वृत्तवाहिनीचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. 

व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनच्या काळात नोकरी गमावलेल्या दीडशे कोटी जणांना रोजगार दिल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, हे खोटं असून पंतप्रधान मोदी यांनी अशा प्रकारचं कोणतंही आश्वासन किंवा दावा केलेला नाही. कोणीतरी मुद्दाम हा फोटो एडिट करुन तो व्हायरल केल्याचं म्हटलं जात आहे.

फॅक्ट चेक -

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकारचं कोणतंही आश्वासन किंवा दावा केलेला नाही. तसंच आजतकनेदेखील याविषयी कोणतं वृत्त दिलेलं नाही. या फोटोसोबत कोणीतरी छेडछाड केली असून हा फोटो एडिट केलेला आहे. तसंच व्हायरल होत असलेला फोटो हा ८ तारखेला पंतप्रधान मोदी लाईव्ह असतांना काढण्यात आला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com