
थोडक्यात:
२०२५ मध्ये भारत आपला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे, जो इंग्रजांच्या अधिराज्याच्या अंताचे प्रतीक आहे.
हा दिवस स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांच्या आठवणी जागवतो आणि देशभक्तीचा उत्साह वाढवतो.
१५ ऑगस्टला देशभर ध्वजारोहण, सजावट आणि गोडधोडासह उत्सव साजरे केले जातात.
Independence Day 2025: यावर्षी भारत देश आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. दीडशे वर्षाहून अधिक काळ आपल्यावरती अधिराज्य गाजवणाऱ्या इंग्रजांना हा दिवस नेहमीच लक्षात राहणार आहे. कारण याच दिवशी भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाचे बाजी लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपल्या भारतात आजही त्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी धगधगत आहेत.
15 ऑगस्ट रोजी लोक गल्ली,शाळा,संस्था इथे सजावट करतात. ध्वजारोहन करून घरोघरी जिलेबी घेऊन जातात. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्तीची देशभक्ती त्यादिवशी दिसून येते. भारताबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे.