फक्त 20 सेकंद मिठी मारा, शरीरात होणाऱ्या पाच बदलांचा अनुभव घ्या!| Hug Day 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hug benefits for health
फक्त 20 सेकंद मिठी मारा, शरीरात होणाऱ्या पाच बदलांचा अनुभव घ्या!| Hug Day 2022

फक्त 20 सेकंद मिठी मारा, शरीरात होणाऱ्या पाच बदलांचा अनुभव घ्या!

व्हेलेंटाईन वीक मधला आजचा आणखी महत्वाचा दिवस. आज हग डे. एक घट्ट मिठी तुमच्यातला स्नेह किती घट्ट आहे याची जाणीव करून देते. मिठीतून प्रेम आणि काळजीही दिसते. तसेच प्रेमाची कबुली दिल्यानंतर जोडीदाराला मिठी मारल्याने तुम्हाला शांतीची अनुभूती मिळते. पण तुमच्या जोडीदाराला (Partner) फक्त 20 सेकंद मिठी (Hug) मारल्याने तुमचे मन शांत होते. मिठी मारण्याचे आणखीही पाच फायदे (Benefits) आहेत. ते समजून घ्या आणि तुमच्या जोडीदाराला आज घट्ट मिठी मारा.

हेही वाचा: मिठी कशी मारावी? 5 चित्रपटांतून घ्या कडकडीत 'ग्यान'

असे होतात पाच फायदे

तणाव कमी होतो- पार्टनरला २० सेकंद मिठी मारल्याने तुमचा ताण कमी होण्यासोबतच चिंताही कमी होते.

मूड सुधारतो- तुमच्या जोडीदाराला मिठी मारणे तणाव कमी करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. जसा तुमचा ताण कमी होतो, तसाच तुमचा मूडही सुधारतो.

रक्तदाब नियंत्रणात राहतो- तुम्ही एकमेकांचा 10 मिनिटे हात धरलात तसेच 20 सेकंद मिठी मारल्यावर तुमच्या रक्तदाबाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. म्हणूनच मिठी मारल्याने रोमँटिक तर वाटतेच शिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

हेही वाचा: मिठी मारण्याचे आहेत अनेक फायदे

Hug benefits for health

Hug benefits for health

शरीराचे दुखणे कमी होते - जर तुम्हाला शरीरात कुठेतरी वेदना होत असतील तर अशावेळी जोडीदाराला मिठी मारल्याने खूप आराम मिळतो. कारण मिठी मारल्याने तुमच्या शरीरात हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे वेदना थोडी कमी होते. त्यामुळे तुम्ही दुखणे विसरता.

भिती कमी होते- जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने तुमच्यातली भिती खूप कमी होते. चिंता आणि तणाव कमी झाल्यामुळे साहजिकच असे होते.

हेही वाचा: Hug Day : गळाभेट द्या, मालामाल व्हा!

Web Title: 20 Seconds Of Hug Is Benefits For Health Valentines Day 2022 Hug Day Special

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top