Relationship Tips: स्वावलंबी मुलीशी लग्न करायचं आहे? मग वागायची बोलायची शिकून घ्या रे तऱ्हा...

आज जरी स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्या तरी त्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे
Relationship Tips
Relationship Tipsesakal

Relationship Tips: समाजात बायकांना फक्त चूल आणि मुलं एवढ्याच साठी मानलं गेलं आहे. बाईने घर आवराव, मुलांना सांभाळव पण तोंडातून एक चकार शब्द काढू नये अशी पूर्वीची धोरणा. अशा वातावरणातही बायकांनी काही कमी कारकीर्द केली नाहीये. असं म्हणतात की इंग्रजांच्या येण्याने समाज बराच बदलला. पण याचं प्रेरणा स्त्रोत म्हणजे राजमाता जिजाऊ आऊसाहेब. मग पुढे अनेक स्वावलंबी आणि आत्मनिर्भर स्त्रिया समाजात क्रांती घडवू लागल्या.

आजच्या जगातही बायका घर आणि नोकरी सांभाळू बघतात पण त्यासाठी प्रत्येकीलाच परवानगी घ्यावी लागत. आज जरी स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्या तरी त्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरुषांची असुरक्षितता. कारण त्या्या घरच्या बायका बाहेर कमावायला गेल्या तर घर आणि मुलं कोण सांभाळणार.

नवीन पिढीतील मुलांना नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न करायचे असते. आताच्या काळात घरातल्या दोघांनी काम करणं गरजेचं आहे, असं नाही होऊ शकत की एकच व्यक्ती करतो आहे आणि जर असंच असेल तर ती व्यक्ती खूप जास्त कमवाणारी असावी. आपण एकत्र कुटुंब पद्धतीत राहण्याला जास्त प्राधान्य देतो. मुलींचाही याला नकार नसतो पण आपल्या कामात तडजोड करावीशी त्यांना वाटत नाही.

Relationship Tips
Relationship Tips : ब्रेकअपनंतर तुमचा एक्स-पार्टनर तुमच्यासोबत काय करू शकतो माहितीये का ?

अशात जिथे घरातली स्त्री सुद्धा बाहेर काम करायला जाते आहे आणि तिलाही घर संभाळण्यात आपली मदत लागेल अशी धारणा असते तिथे घरात कधीही भांडणं होत नाही आणि नात्यात दुरावाही येत नाही. अशात तुम्हीही एका स्वावलंबी आणि नोकरी करणाऱ्या मुलीच्या प्रेमात असाल किंवा अशा एखादीशी लग्न करु इच्छित असाल तर आधी त्यांच्याशी कसं वागायचं हे समजून घ्या.

1. घरातील कामात मदत करावी लागेल

बायको नोकरी करत असेल तर ऑफिसला जाण्याआधी आणि परत आल्यानंतर घरची सगळी कामं एकटीनेच करावीत अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. तीही तुमच्यासारखी 8-9 तास काम करुन घर सांभाळत असते त्यामुळे तिला कामात मदत करावी लागेल.

2. मुलांना एकत्रपणे सांभाळणं आणि त्याची जबाबदारी एकत्रितपणे उचलणं

एखाद्या मुलाला जगात आणण्यासाठी जशी पुरुष आणि स्त्री दोघांचीही गरज असते. तशीच त्यांची काळजी घेणे ही देखील दोघांची जबाबदारी आहे. बहुतेकदा पुरुषांना मुलांना सांभाळता येत नाही पण याचा अर्थ आपण प्रयत्नच करु नये असं नाही ना. मुलाची काळजी घेण्यात आणि त्याला वाढवण्यात तुम्ही आपल्या बायकोला सगळ्या पद्धतीची मदत केली पाहिजे. मुळात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.

Relationship Tips
Relationship Tips : लग्नानंतर नव्या नवरीच्या सुखासाठी प्रत्येक नवऱ्याने हे केलंच पाहिजे!

3. एकट्याने कोणताही निर्णय न घेणं

तुमची बायको तुमच्या बरोबरीने काम करते आहे अर्थात तिलाही तिचा स्वतःचा अनुभव आहे. तिनेही जग बघितलं आहे अशात कोणताही निर्णय तुला काय कळणार आहे असं म्हणून घेऊ नका. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाचं तुम्हा दोघांशी संबंधित असलेल्या प्रत्येक निर्णयात तुमची बायको 50 % सहभागी आणि पूर्णपणे संमत असली पाहिजे. तुम्ही बायकोला गृहीत धरण तुमच्या नात्यात कटुता आणू शकते, अगदी तुमचं नातं बिघडवू शकते.

4. नोकरी मध्ये तडजोड करायला लावू नका

लग्नानंतर मी नोकरी केली तर चालेल का हे विचारल्यावर अनेकदा पुरुष त्याला होकार देतात, पण जेव्हा तो पाहतो की सालाबादप्रमाणे पुरुषांना मिळतो तसा पती या नात्याने आपल्याला मान आणि आदर मिळत नाहीये उलट घरची कामे सुद्धा त्यालाच करावी लागतात तेव्हा तो आपल्या पत्नीने काम सोडावे अशी अपेक्षा करतो. जरी काही स्त्रिया त्यांच्या स्वप्नांचा त्याग करतात आणि त्यांच्या कुटुंबासाठी करियर सोडतात. पण ज्या मुलीशी तुम्ही लग्न कराल ती मुलगीही असे असं करेलच असं नाही शिवाय आत्ताच्या जगात तिने असं करावं अशी अपेक्षाच मुळात चुकीची आहे.

Relationship Tips
Relationship Tips : कधीतरी बोला खोटं; नातं होईल अधिक घट्ट

5. प्रेमासोबतच आदरही आवश्यक आहे

प्रत्येकाला स्वतःचा आपला मान आणि आदर हा मिळालाच पाहिजे. महिला ह्या मनाने भावनिक असतात. पण यासोबतच प्रत्येक परिस्थितीला एकटीने सामोरे जाण्याची ताकदही त्यांच्यात असते. अशा परिस्थितीत, त्यांच्यासोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहण्याआधी, आपण त्यांना अपमानित करु शकत नाही हे जाणून घेतले पाहिजे. तुम्ही असे केल्यास, ती तुमच्यावर प्रेम करत असली तरी स्वतःच्या स्वाभिमानासाठी तुम्हाला सोडून जाण्यापूर्वी ती मागेपुढे पाहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com