Relationship Tips : कधीतरी बोला खोटं; नातं होईल अधिक घट्ट

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदाराकडून अपार प्रेमाची अपेक्षा असते. सोबत नसतानाही त्याच्या जोडीदाराने त्याला नेहमी लक्षात ठेवावं असं त्याला वाटतं.
Relationship Tips
Relationship Tipsgoogle

मुंबई : जर तुम्हाला तुमचे उर्वरित आयुष्य एखाद्यासोबत घालवायचे असेल तर तुम्ही प्रामाणिक असणे फार महत्वाचे आहे यात शंका नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेहमी सत्य सांगावे.

नाते घट्ट होण्यासाठी तुम्ही एकमेकांच्या भावना दुखावण्याचे कसे टाळता हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कधी कधी खोट्याचा आधार घ्यावा लागला तरी ते चुकीचे नाही. (lies that help you to save relationship how to improve bonding with partner )

ऑक्सफर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ रॉबिन डनबर यांनी केलेल्या अभ्यासात, नातेसंबंधात खोटे बोलण्याच्या परिणामांची तुलना केली आहे. त्यांना असे आढळून आले की एखाद्याच्या भावना दुखावल्या जाण्यापासून वाचवण्यासाठी खोटे बोलल्याने नातेसंबंध मजबूत होतात.

Relationship Tips
Pregnancy Test At Home : घरच्या घरी घ्या 'गोड बातमी'चा अंदाज

मला तुझी आठवण येते...

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदाराकडून अपार प्रेमाची अपेक्षा असते. सोबत नसतानाही त्याच्या जोडीदाराने त्याला नेहमी लक्षात ठेवावं असं त्याला वाटतं.

अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही काही दिवस एकमेकांपासून दूर जाल तेव्हा मेसेज किंवा फोन कॉलवर 'आय मिस यू' म्हणा, जरी तुम्ही त्यांना तितकेसे मिस करत नसलात तरी. असे केल्याने अनेकवेळा जोडीदारांमधील मोठी भांडणेही संपतात.

हा ड्रेस तुला छान दिसतो

स्त्री असो वा पुरुष, दोघांनाही आपल्या कपड्यांचे कौतुक ऐकायला आवडते. अशा स्थितीत तुमच्या जोडीदाराच्या लूकची नेहमी प्रशंसा केल्याने तुमच्या दोघांमधील जवळीक वाढू शकते.

असे केल्याने तुमच्या जोडीदाराला असे वाटू शकते की तुमचे त्याच्याकडे लक्ष आहे. ही अपेक्षा प्रत्येकाला असते.

तुझ्या हाताला चव आहे

ही पद्धत आपल्या पत्नीला संतुष्ट करण्याचा आणि आपल्या पतीला किंवा प्रियकराला स्वयंपाक करण्यास प्रवृत्त करण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग आहे.

अन्नामध्ये थोडेफार कमी असणे ही एक अत्यंत किरकोळ समस्या आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून, आपण आपल्या जोडीदाराच्या स्वयंपाकाचे कौतुक केले पाहिजे. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी स्वयंपाक करणे कधीही ओझे वाटणार नाही.

Relationship Tips
Controlling Partner : जोडीदार तुम्हाला त्याच्या तालावर नाचवतोय हे वेळीच ओळखा

तू मला सर्वात गोड भेट दिलीस

अनेक वेळा असे घडते की जोडीदाराने आणलेल्या भेटवस्तू आवडत नाहीत आणि तुमची निराशा होते. पण तुम्ही ते स्वतःकडे ठेवावे. तुमची नाराजी स्पष्टपणे व्यक्त करून तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना दुखावू शकता. तसेच, तुम्हाला पुन्हा भेट देण्याची कल्पना त्यांना नकोशी वाटू शकते.

नियोजनाचं कौतुक

घर असो किंवा ऑफिस, अनेक कामे करण्याची जबाबदारी माणसाच्या खांद्यावर असते. यामुळे अनेकवेळा तो खूप अस्वस्थ होऊ लागतो, आणि त्याचे १००% देऊ शकत नाही.

अशा परिस्थितीत, 'तू सगळ्याचं नियोजन किती चांगलं करतोस' हे तुमचे म्हणणे त्यांना चांगले वाटण्यास आणि त्यांचे मनोबल वाढविण्यात प्रभावी ठरू शकते. यामुळे तुमचे परस्पर बंधही घट्ट होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com