Skin Care Tips: सुंदर-आकर्षक असे कोपर अन् गुडघे हवे आहेत? मग या टिप्स करा फॉलो

आपली त्वचा सुंदर ठेवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात पण या सगळ्या उपायांमध्ये कोपरे आणि गुडघे सुटतात
How To Clean Elbow And Knees skin care tips
How To Clean Elbow And Knees skin care tipsesakal

How To Clean Elbow And Knees: आपण सगळ्याच बॉलीवूड सेलिब्रेटींना (bollywood celebirty skin care tips) बघतो त्यांचे कोपरे, गुडघे हे खूप पांढरे शुभ्र आणि खूप आकर्षक असतात. तेच आपण आपले कोपरे आणि गुडघे बघितले, तर सगळे काळे आणि रुक्ष दिसतात, असं का?

आपली त्वचा सुंदर (beauty tips) ठेवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात पण या सगळ्या उपायांमध्ये कोपरे आणि गुडघे सुटतात. काही स्लिव्ह लेस टॉप किंवा शॉर्ट ड्रेसेस परिधान करायच म्हटलं की गुडघे आणि कोपर घाण आणि काळे दिसायला लागतात. परिणामी आपण फॅशनेबल (fashinable outfits) कपडे वापरणे टाळतो. 

How To Clean Elbow And Knees skin care tips
Skin Care : रूप निखारे चंदन, त्वचेवर चंदन लावण्याचे एवढे फायदे

त्वचेची काळजी घेण्याचा विशेष दिनक्रम पाळला (skin care routine) तरी कोपर आणि गुडघे स्वच्छ होण्याचे नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीत जर तुमच्या कोपरावर घाण जमा झाली असेल तर काही घरगुती (home made tips) वस्तूंनी तुम्ही काही मिनिटांत त्वचा चमकदार बनवू शकता. चला जाणून घेऊया कोपर आणि गुडघे स्वच्छ करण्याच्या टिप्स… 

How To Clean Elbow And Knees skin care tips
Summer Skin Care: चेहऱ्याला लावा हा फ्रूट ज्यूस आणि पहा कमाल; २ आठवड्यात Wrinkles होतील गायब, चेहरा दिसेल तरुण

कोपर आणि गुडघे स्वच्छ करण्याच्या टिप्स: (How To Clean Elbow And Knees)

1. काकडी (Cucumber): 

काकडीच्या (cucumber for healthy skin) मदतीने तुम्ही कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करू शकता. यासाठी काकडी गोल आकारात कापून घ्या. आता काकडीचे काप कोपर आणि गुडघ्यावर चोळा. 15 मिनिटे चोळल्यानंतर 5 मिनिटे काहीही करु नका हे अवयव कोरडे होऊ द्या. यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमचे कोपर आणि गुडघे स्वच्छ होतील.

How To Clean Elbow And Knees skin care tips
Summer Skin Care: उन्हाचा तडाखा वाढतोय..सनस्क्रीन लावायला विसरू नका, Tanning चा धोका टळेल

2. बेकिंग सोडा आणि लिंबू (Baking Soda and Lemon): 

बेकिंग सोडा त्वचेसाठी सर्वोत्तम क्लिन्झर (natural cleanser for skin)  मानला जातो. तर, अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध लिंबू त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास उपयुक्त आहे. अशावेळी लिंबू मधून कापून घ्या. आता त्यावर 1 चमचा बेकिंग सोडा टाका आणि कोपर आणि गुडघ्यांना चोळा. त्यानंतर १५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.

How To Clean Elbow And Knees skin care tips
Skin Care Tips : सनस्क्रीनवर असलेल्या SPF लेबलचा अर्थ काय, आपल्या स्कीनला कसा फायदा होतो?

3. कोरफड आणि दूध (Elovera Gel and Milk): 

कोरफड (elovera gel), औषधी घटकांनी समृद्ध, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल घटकांचा चांगला स्रोत मानली जाते. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेलमध्ये दूध (milk for skin brightning) मिसळा. आता कोपर आणि गुडघ्यांवर लावा. सकाळी उठल्यानंतर ताज्या पाण्याने त्वचा धुवा.

How To Clean Elbow And Knees skin care tips
Skin Care : स्क्रबिंग किती वेळ करावं हेसुद्धा माहिती असणं गरजेचं? नाहीतर चेहरा...

4. बटाट्याचा रस (Potato): 

कोपर आणि गुडघ्यांमध्ये साचलेली घाण दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा रस वापरु शकता. यासाठी बटाटे किसून घ्या. आता एका भांड्यात त्याचा रस पिळून घ्या. नंतर बटाट्याचा रस त्वचेवर लावा आणि 15 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून मॉइश्चरायझर लावा.

How To Clean Elbow And Knees skin care tips
Skin Care : संत्र्याची साल टाकण्याऐवजी त्वचेसाठी वापरा

5. हळद (Turmeric): 

त्वचा सतेज करण्यासाठी (glowing skin tips) एक प्रभावी पर्याय म्हणजे हळद. यासाठी एका वाटीत 1 चमचा हळद घ्या आता त्यात थोडस दूध टाका. त्याची छान अशी पेस्ट बनवा. घरात असेल तर त्यात थोडंसं गुलाब जल सुद्धा टाका. आता ही पेस्ट कोपर आणि गुडघ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर काही वेळाने त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.

How To Clean Elbow And Knees skin care tips
Summer Skin Care: उन्हाळ्यात फक्त या ५ गोष्टींच्या मदतीने त्वचा होईल चमकदार आणि तरुण

6. खोबरेल तेल (coconut oil): 

खोबरेल तेल वापरुन तुम्ही कोपर आणि गुडघ्यांची त्वचा देखील स्वच्छ करु शकता. यासाठी दररोज आंघोळीनंतर त्वचेला खोबरेल तेल लावावे. नंतर कोपर आणि गुडघ्यांना 2-3 मिनिटे मालिश करा.

How To Clean Elbow And Knees skin care tips
Skin Care : चेहऱ्यावर केळं लावण्याचे फायदे

7. मध (honey): 

मधाच्या मदतीने तुम्ही त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवू शकता. यासाठी अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये 2 चमचे मध आणि 1 चमचा बेकिंग सोडा मिसळा. आता हे मिश्रण त्वचेवर लावा आणि 20-30 मिनिटांनंतर त्वचा थंड पाण्याने धुवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com