Unwanted Hairs Treatment : वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगने नाही तर या उपायांनी काढा चेहऱ्यावरचे केस

चेहऱ्यावरचे केस ही प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यातली खूप मोठी समस्या
Unwanted Hairs Treatment
Unwanted Hairs Treatmentesakal

Unwanted Hairs Treatment : चेहऱ्यावरचे केस ही प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यातली खूप मोठी समस्या आहे; एक वेळेस हातापायाच्या केसांसाठी कोणती ट्रीटमेंट नाही केली तरी चालते, पण चेहऱ्यावरच्या केसांच्या बाबतीत अस करून चालत नाही. बाजारात वॅक्सिंग, थ्रेडिंग, ब्लीच असे कितीही पर्याय उपलब्ध असले तरी हे उपाय कुठतरी चेहऱ्याला इजा पोहोचवतात; शिवाय याने आपल्याला त्रासही होतो.

Unwanted Hairs Treatment
Mental Treatment : मानसिक उपचारांना विम्याचे कवच

पण आता या पार्लर ट्रीटमेंट सोडून द्या; त्यापेक्षा हे घरगुती आयुर्वेदिक उपाय करा. मुळात हे आयुर्वेदिक उपाय असल्याने आपल्या त्वचेला याचा काहीही अपाय होणार नाही आणि केस तर निघतीलच पण सोबत त्वचा तजेलदारही होईल.

Unwanted Hairs Treatment
Smooth Hair: फ्रिजी अन् रफ केसांना मिनिटांमध्ये करा स्मुथ, 'या' पाच सोप्या ट्रिक्स करा फॉलो

1. अंड आणि कॉर्नस्टार्च

अंड्यामुळे चेहऱ्याला नरिशमेंट मिळते; अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये एक चमचा कॉर्नस्टार्च आणि एक चमचा कॅस्टर शुगर घाला. चेहरा स्वच्छ धुवून कोरडा पुसून घ्या आणि चेहऱ्यावर केसांच्या वाढीच्या दिशेने लावून घ्या. ते कोरडे होईपर्यंत त्वचेवर राहू द्या. आता केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने ओढून काढून टाका आणि साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धून घ्या. चेहरा ओढल्यासारखा वाटत असेल तर त्यावर गुलाबजल किंवा अलोवेरा जेल लावा.

Unwanted Hairs Treatment
Winter Hair Dandruff : हिवाळ्यात केसामध्ये खूप कोंडा होत असेल तर 'हे' उपाय करून बघा...

2. ओट्सचे जाडे भरडे पीठ आणि केळ

एक पिकलेले केळ स्मॅश करा आणि त्यात दोन चमचे ओट्सचे जाडे भरडे पीठ घाला. ही पेस्ट त्वचेवर लावा आणि 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा. याने चेहऱ्यावरच्या डेड सेल्स आणि नको असलेले केस काढायला मदत होते.

Unwanted Hairs Treatment
Hair Care : केस धुताना ही काळजी नक्की घ्या...

3. जिलेटिन आणि दूध

एक चमचा अनफ्लेवर्ड जिलेटिन, तीन चमचे दूध आणि लिंबाचा रस एकत्र छान मिक्स करा. मायक्रोवेव्ह मध्ये 15 सेकंद हे गरम करून घ्या. थोडं कोमट होऊ द्या, एकदा परत छान मिक्स करून मास्क बनवा. थोड्यावेळाने धुवून काढू टाका.

Unwanted Hairs Treatment
Hair Growth : केस उभे करणारा प्रश्न! आयुष्यभर कटिंग केली नाही तर....

4. बेसन आणि गुलाबपाणी

बेसन कधीही त्वचेसाठी खूप गुणकारी असतं. या मास्कसाठी गुलाब पाण्यात दोन चमचे बेसन आणि एक चमचा लिंबाचा रस, हे सगळ व्यवस्थित मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर बोटांनी चोळून काढून टाका; चेहरा कोरडा किंवा ओढल्यासारखा वाटत असेल तर थोडंसं गुलाब जल लावा.

Unwanted Hairs Treatment
Hair Transplant Failure : केस प्रत्यारोपण फेल का होते?; जाणुन घ्या

5. जर्दाळू आणि मध

जर्दाळू घ्या, ते चांगले ठेचून घ्या, आता दोन चमचे ठेचलेले जर्दाळू आणि एक चमचा मध एका वाटीत घ्या, ते छान मिक्स करून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी घासून काढून घ्या.

Unwanted Hairs Treatment
Hair Care: हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी?

6. पपई आणि हळद

पपईचे आपल्या चेहऱ्यासाठी खूप गुणकारी उपाय आहेत. पपईची एक फोड घ्या त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि त्याची मिक्सर मध्ये पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी स्वच्छ धुवून घ्या. पपईमध्ये एंजाइम असते, जे चेहऱ्यावरील केस काढण्यास मदत करते.

Unwanted Hairs Treatment
Hair Conditioner : महागड्या कंडिशनर्सना करा बाय-बाय; आता घरच्या घरी बनवा नॅचरल हेअर कंडिशनर!

7. जव आणि दूध

एक चमचा जवसाची पावडर, दूध आणि एक चमचा लिंबाचा रस एका वाटीत मिक्स करा. ही पेस्ट तुमच्या त्वचेवर अर्धा तास लावून मग काढून टाका.

Unwanted Hairs Treatment
Winter Hair Fall : हिवाळ्यात Hair Fall वाढलाय? 'या' गोष्टींची घ्या काळजी

8. मेथी आणि हरभरा

दोन चमचे मेथीचे दाणे आणि दोन चमचे हरभऱ्याचे दाणे मिक्सर मध्ये बारीक वाटून पावडर बनवा. याची पेस्ट बनवण्यासाठी त्यात गुलाबजल घाला; गुलाबजल नसेल तर तुम्ही पाणीही घालू शकतात आणि नको असलेल्या केसांवर लावा. 20 मिनिटांनी स्वच्छ धुवून घ्या.

Unwanted Hairs Treatment
Winter Hair Care : हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

Disclaimer : सदर लेख हा सामान्य माहितीच्या आधारावर लिहिलेला आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. कोणतेही उपत करण्या आधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com