जेवणासोबत फळे खाताय, तर सावधान! जाणून घ्या आयुर्वेद काय म्हणते | LifeStyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fruits
जेवणासोबत फळे खाताय, तर सावधान! जाणून घ्या आयुर्वेद काय म्हणते

जेवणासोबत फळे खाताय, तर सावधान!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अनेकांना अशी सवय असते, की ते जेवणासोबत फ्रूट सॅलड (Fruit salad) खातात. पण, तुम्हाला माहीत आहे का, की आयुर्वेदानुसार (Ayurveda) फळांचे सेवन कधीही जेवणासोबत करू नये. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) तर कमकुवत होतेच, पण त्यामुळे पचनाशी (Digestion) संबंधित अनेक समस्या उद्‌भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात, आयुर्वेदात अन्नासोबत फळे खाण्यास का मनाई करण्यात आली आहे, त्याबद्दल.

हेही वाचा: समुद्राच्या तळाशी सापडले कोरोनावर रामबाण औषध!

जेवणासोबत फळे खाऊ नका

इतर कोणत्याही अन्नापेक्षा फळे लवकर तुटतात. फळे ही इतर कोणत्याही खाद्यपदार्थात मिसळल्यास शरीरात त्याची विषद्रव्ये तयार होतात, ज्याला आम्ल (ऍसिड) निर्मिती असेही म्हणतात. जड अन्न पचत नाही तोपर्यंत फळे पोटात राहतात, ज्यामुळे शरीराला पोषक तत्त्वे शोषून घेणे कठीण होते. या कारणास्तव, आजार आणि इतर आरोग्य - संबंधित परिस्थितींचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, दूध आणि दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांसह फळे खाल्ल्याने त्वचाविकार होऊ शकतात, जसे की मुरुम, सोरायसिस आणि एक्‍जिमा होऊ शकते.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

फळे शिजवणेही योग्य नाही

फळे सहसा चमकदार रंगाची असतात. फळाचा चमकदार रंग अग्नि ऊर्जेशी संबंधित आहे. फळे ही कच्ची खाल्ल्यास पाचन अग्नीला उत्तेजित करतात, तुमचे पाचक आरोग्य सुधारण्यास आणि पोटाचे विकार दूर करण्यास मदत करतात. फळे शिजवल्याने पाचन अग्नी आणि पोषक तत्त्वांचा नाश होतो. अशा परिस्थितीत शिजवलेली फळे खाणे किती धोकादायक आहे, हे समजून येते.

loading image
go to top