Height Tips : लहान मुलांची उंची वाढवायची आहे? मग, आजच त्यांच्या आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

Height Tips : लहान मुलांचा शारिरीक आणि मानसिक विकास योग्य प्रकारे व्हावा, यासाठी त्यांच्या आहाराची नीट काळजी घेणे, महत्वाचे आहे.
Height Tips
Height Tipsesakal

Height Tips : लहान मुलांचा शारिरीक आणि मानसिक विकास योग्य प्रकारे व्हावा, यासाठी त्यांच्या आहाराची नीट काळजी घेणे, हे फार महत्वाचे आहे. यासाठी त्यांच्या आहारात पोषकतत्वांनी युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करणे, गरजेचे आहे. मुलांच्या वाढीवर आहाराचा खास करून परिणाम होतो. मात्र, पालकांसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे मुलांची उंची होय.

वयानुसार, जेव्हा मुलांची उंची वाढत नाही तेव्हा, पालकांना सर्वाधिक काळजी वाटू लागते. मग, मुलांची उंची वाढवण्यासाठी पालक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. जर तुम्हाला ही तुमच्या मुलांच्या उंचीची काळजी वाटत असेल तर, चिंता करू नका. कारण, आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा समावेश जर तुम्ही मुलांच्या आहारात केला, तर त्यांची उंची वाढू शकते. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

Height Tips
Parenting Tips : मुलांचा सतत मूड बदलतोय? मग, 'या' पद्धतीने करा हॅंडल

फळे

आपल्या आहारात फळांचा समावेश असणे, हे सर्वांसाठी फार महत्वाचे आहे. फळांमुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. संत्रा, जांभूळ आणि पपई सारख्या फळांमध्ये जीवनसत्वांचे आणि पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळते.

या फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी हे कोलेजन उत्पादन आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे देखील विपुल प्रमाण आढळून येते. विशेष म्हणजे या फळांमध्ये असलेले व्हिटॅमीन सी हे लोहाची कमतरता भरून काढते, जे मुलांच्या वाढीसाठी फार महत्वाचे आहे.

ड्रायफ्रूट्स आणि बिया

आरोग्यासाठी फायदेशीर असणारे ड्रायफ्रूट्स अर्थात सुकामेवा हा सर्वांना खायला आवडतो. या सुकामेव्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता, मनुके, अक्रोड इत्यादी घटकांचा समावेश असतो. या सुकामेव्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

प्रथिने आणि मॅग्नेशिअमचा उत्तम स्त्रोत म्हणूण बदाम, अक्रोड आणि चिया सीड्स (चिया बिया) यांना ओळखले जाते. हे घटक आपल्या शरीरातील हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत. शिवाय, या घटकांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी आढळून येते. मेंदूच्या विकासासाठी आणि ऊर्जा उत्पादनासाठी मदत करण्याचे काम हे घटक करतात. त्यामुळे, ड्रायफ्रूट्स आणि बियांचा तुमच्या मुलांच्या आहारात जरूर समावेश करा.

डेअरी प्रॉडक्ट्स

जी मुले नियमितपणे दुग्धजन्य खाद्यपदार्थांचे सेवन करतात त्यांच्या शरीरातील हाडांची वाढ योग्य प्रकारे होते, असे एका अभ्यासात म्हटले आहे. या दुग्धजन्य खाद्यपदार्थांचे नियमितपणे सेवन केल्याने मुलांची उंची वाढण्यास देखील हातभार लागतो. अशा स्थितीमध्ये आपल्या मुलांची उंची वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात दूध, चीज आणि दही यांचा अवश्य समावेश करा.

Height Tips
Vegan Diet : वीगन डाएट सुरू केल्यानंतर तुमच्या शरीरात होऊ शकतात ‘हे’ बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com