Alcohol habit : दारूचं व्यसन लागंलय हे कसं ओळखावं; दारू सोडण्यासाठीचे काही सोपे उपाय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alcohol habit

Alcohol habit : दारूचं व्यसन लागंलय हे कसं ओळखावं; दारू सोडण्यासाठीचे काही सोपे उपाय!

अल्कोहोल व्यसन हा एक जुनाट व्यसन आहे. त्यामूळे अनेक गंभीर रोगांचा सामनाही करावा लागतो. दारूचे व्यसन जडलेलं आहे हे लक्षात येण्याआधीच अनेक लोक त्याच्या आहारी जातात. अशा लोकांना मद्यपान सोडणे अशक्य बनते.

काही लोकांना आपण या व्यसनाच्या आहारी गेलो आहोत हे समजत नाही. हातातून वेळ निघून गेल्यावर ते जागे होतात. पण, तेव्हा सर्व गोष्टी तूमच्या हाताबाहेर गेलेल्या असतात. त्यामूळे मद्यपान सोडणे शक्य होत नाही, अशावेळी काय उपाय करावेत हे पाहुयात.

हेही वाचा: Alcohol Odor : दारु पिल्यानंतर तोंडाचा वास येऊ नये म्हणून काय करावे?

जर तुम्हाला दररोज दारू पिणं गरजेचं वाटत असेल, दारू नाही प्यायली तर तुमचा संताप होत असेल, तुम्ही हळू हळू गोष्टी विसरू लागला असाल, दारूमुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडत असेल, दारू पिण्यामुळे तुमची शुद्ध जात असेल तर तुम्ही पूर्ण पणे दारूच्या आहारी गेलेला आहात.

तुम्हाला दारू पिण्याचे भयंकर व्यसन जडलं असेल आणि त्याचे दुष्परिणाम पाहून तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. दारू सोडणं ही एक महाकठीण गोष्ट आहे. कारण पहिल्यांदा माणूस जाणिवपूर्वक दारूला जवळ करतो आणि नंतर दारू माणसाला काही केल्या सोडत नाही.

हेही वाचा: Cheers Meaning : दारु पिताना लोक 'चिअर्स' का म्हणतात?

दारूच्या व्यसनाची लक्षणे

- एकट्याने मद्यपान करणे.

- दारूचे परिणाम जाणवण्यासाठी जास्त मद्यपान करणे.

- पिण्याच्या सवयींबद्दल कोणी काही बोललं की राग येणे.

- स्वत:कडे लक्ष न देणे.

- काम किंवा शाळेच्या ठिकाणी मद्यपान करून जाणे.

हेही वाचा: Alcohol habit : ‘अभी जिंदा हु तो पि लेने दो’; असं म्हणत दरवर्षी दिड लाख लोकं सोडतात जीव!

दारूच्या व्यसनाची शारिरीक लक्षणे

- सतत मद्य प्यावे वाटणे.

- अल्कोहोल न घेतल्याने मळमळ आणि उलट्या होणे.

- मद्यपान केले नाही तर शरिरात थरकाप उडणे.

- मद्यपान न केल्यास चिडचीड होणे

मद्यपान सोडण्यावरील उपाय

योग्य सल्ला

दारू सोडवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूपच गरजेचं आहे. कारण दारू सोडणं ही गोष्ट शक्य असली तरी जर तुम्हाला अती दारू पिण्याचे व्यसन जडले असेल तर त्याचे काही साईड इफेक्टही तुम्हाला काही दिवस भोगावे लागतात. मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे डॉक्टर योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात.

मेडिटेशन करेल मदत

दारू सोडण्यासाठी कोणती गोष्ट तुमच्या फायद्याची आहे यावर लक्ष द्या. कारण याबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात मेडिटेशनने करून बरं वाटत असेल तर तसं करा.

मद्यपानासाठी औषधे

मेडिकल सायन्सने बनवलेली काही औषधे अल्कोहोल पिण्याच्या तीव्र इच्छाशी लढण्यास मदत करू शकतात. डिटॉक्सिफिकेशन काही औषधे अल्कोहोल न पिल्याने उद्भवणारी लक्षणे टाळण्यासाठी वापरली जातात. त्याचा कोर्स चार ते सात दिवस चालतो.  

हेही वाचा: Hyderabadi Style Biryani : थर्टी फर्स्ट पार्टीसाठी बनवा खास हैद्राबादी स्टाईल बिर्याणी! एकदम सोपी रेसिपी

इतर ऍक्टिव्हीटी करा

दारू सोडण्यासाठी अनेक पर्याय तुमच्यासमोर आहेत. त्यातील कोणती अॅक्टिव्हिटी तुम्ही दारू पिण्याऐवजी करू शकता हे तुम्हीच ठरवा. जसं की तुम्ही जीम मध्ये व्यायाम करायला आवडतं, स्वंयपाकाची आणि इतरांना खाऊ घालायला आवडतं, गाणं गायला आवडतं, चित्र काढण्यामध्ये तुमचं मन अधिक रमतं की खेळ खेळायला आवडतात. हे सर्वस्वी तुमच्या आवडीनिवडींवर अवलंबून आहे.

हेही वाचा: कुटुंब डॉट कॉम : ‘कुटुंबा’ला पर्याय नाही!

दारु सोडण्याचे कारण शोधा

दारू सोडण्यामागचं तुमचं नेमकं कारण काय ते शोधा आणि त्या मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जसं की जोडीदाराला आनंदी ठेवायचं आहे, आई-बाबा व्हायचं आहे, करिअरवर फोकस करायचं आहे, आरोग्य हवं आहे. अशा मोठया ध्येयाकडे लक्ष दिलं तर दारूचं व्यसन सोडण्यासाठी तुम्हाला चांगले प्रोत्साहन मिळेल.