Hyderabadi Style Biryani : थर्टी फर्स्ट पार्टीसाठी बनवा खास हैद्राबादी स्टाईल बिर्याणी! एकदम सोपी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hyderabadi Style Biryani

Hyderabadi Style Biryani : थर्टी फर्स्ट पार्टीसाठी बनवा खास हैद्राबादी स्टाईल बिर्याणी! एकदम सोपी रेसिपी

Hyderabadi Style Biryani : 31st च्या दिवशी नक्की काय प्लॅनिंग आहे? रोजची भाजी पोळी तर कोणीच खाऊ इच्छित नसेल, पण त्याच त्याच पनीरच्या भाजीने कंटाळाही आला असेलच ना.. आणि 31st ची रात्र आहे म्हटल्यावर काहीतरी स्पेशल तर व्हायलाच पाहिजे. मग ट्राय करा हैद्राबादी स्टाईल बिर्याणी. खरंतर बिर्याणी म्हटलं की लोकं घाबरतात कारण ती करण खरंच खूप कठीण असतं; याच तुमच्यासाठी ही स्पेशल सोपी रेसिपी

हेही वाचा: Food Recipe : फक्त गुजरात्यांची मोनोपॉली नाही तर घरच्या घरी बनवा खमंग चटपटीत ढोकळा

साहित्य:

- 500 ग्रॅम बासमती तांदुळ

- 500 ग्रॅम चिकन

- 10-12 कांदे चिरून

- 5-6 चिरलेले टोमॅटो

- 250 ग्रॅम दही

- 4-5 तमालपत्र

- 7-8 लवंग

- 4-5 हिरवी वेलची

- 4-5 तमालपत्र

- 7-8 लवंग

- 4 काड्या दालचीनी

- 1 सुंठ

- 12-14 काळीमिरी

- 1 टेबलस्पून जिरे

- 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट

- 1 टेबल स्पून बिर्याणी मसाला

- 1/2 चमचा लाल तिखट

- 2-3 पुदिन्याची पाने

- 3-4 कोथिंबीरीच्या काड्या

- 3 हिरव्या मिरच्या

- चवीनुसार मीठ

हेही वाचा: Farali Misal Recipe: शुक्रवार उपवासानिमित्त बनवा खास फराळी मिसळ

कृती:

स्टेप 1

प्रथम चिकन स्वच्छ गरम पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्या. मग व्हिनेगरने सुद्धा धुवून घ्या, मग चिकन पिसेस दही, आले लसूण पेस्ट, मीठ घालून एक तास मेरीनेट करण्यासाठी ठेवून द्या.

स्टेप 2

एका मोठ्या पातेल्यात पाणी घालून त्यात एक तमालपत्र, दोन इंच लांबीची दालचिनी, तीन वेलची, चार दगडफुल,चार लवंग,पाच काळेमिरी टाका.

हेही वाचा: New Year Celebration : नवीन वर्षात घरीच बनवा हेल्दी केक, जाणून घ्या खास रेसिपी

स्टेप 3

हे सर्व मसाल्यासोबत पाणी उकळून घ्या आणि नंतर बासमती तांदळाला लागेल तेवढे पाणी घेऊन तांदूळ अर्धे कच्चे शिजवून घ्या. मग गॅस बंद करून भात चाळूण बाजुला ठेवा.

स्टेप 4

एका कढईत तूप घालून तमालपत्र, जिरे, उरलेली लवंग, काळीमिरी, दालचीनी

आणि वेलची परतून घ्या. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मंद गॅसवर कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्या.

हेही वाचा: Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

स्टेप 5

मग त्यात आले लसूण पेस्ट घालून परतून, नंतर हिरवी पेस्ट घालून पाच मिनीटे परतून घ्या.

स्टेप 6

नंतर त्यात बिर्याणी मसाला, धणे पावडर, हळद, लाल मिरची पावडर एकत्र करून घ्या. आता चिरलेले टॉमॅटो, कोथिंबीर घालून दोन मिनिटे परतून त्यात दही घालून त्या मसाल्यात एकजीव करून घ्या आणि पंधरा मिनिटे ते शिजवून घ्या. सगळ्यात शेवटी मेरीनेट केलेले चिकन दह्या सोबत पाच मिनीट शिजवून घ्या. चिकनला उकळी येऊ देऊ नका. फक्त अर्ध शिजवून गॅस बंद करा.

हेही वाचा: Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

स्टेप 7

आता दुसऱ्या एका पातेल्यात थर लावून घेऊ.अर्धा चिकनचे थर घेऊ, मग त्यावर भाताचा थर,त्यावर थोडे तूप घालून मग पुन्हा चिकनचा थर मग उरलेला भात तूप आणी केशर घालून छान वाफ काढून घ्या. मोठा तवा गॅसवर ठेवुन त्यावर बिर्यानीचे पातेले ठेवून वीस ते पंचवीस मिनिटे वाफ काढता येईल.

स्टेप 8

अश्या रीतीने आपली चिकन बिर्याणी तयार आहे. दही, खारी बुंदी रायता तयार करून हैदराबादी चिकन बिर्याणी सर्व्ह करा.