Glowing Skin : तिशीनंतर 'हे' तेल दोन पद्धतींनी लावा अन् बघा चमत्कार, वाढतं वय अजिबात दिसणार नाही

तिशीनंतर या पद्धतीने चेहऱ्याला तेल लावा अन् चमत्कार स्वत:च बघा
Glowing Skin
Glowing Skinesakal

Almond Oil Benefits For Glowing SKin : तिशीनंतर चेहऱ्याची काळजी वेगळ्या पद्धतीने घ्यायची गरज असते. नाहीतर चेहऱ्यावर फाइन लाइन्स आणि रिंकल दिसायला सुरुवात होते.बरेचदा त्वचेला व्यवस्थित हायड्रेट न केल्याने या समस्या उद्भवतात. वेळेआधीच म्हातारपण येऊ नये असे तुम्हालाही वाटत असेल तर रोज बदाम तेल चेहऱ्याला लावायला हवं. चेहऱ्याला हे तेल लावण्याच्या दोन पद्धती आहेत. त्या वापरल्यास तुमचा चेहरा अगदी कियारासारखा दीर्घकाळ तेजस्वी दिसेल.

बदाम तेल लावण्याचे फायदे

बदामाच्या तेलात मोठ्या मात्रेत व्हिटामिन ई आणि अँटी ऑक्सीडेंट असतात. हे तत्व त्वचेतील एजिंग स्पीड कमी करतात. तसेच चेहऱ्यावर दिसणाऱ्या लाइन्स नष्ट करतात आणि त्वचेला आतून हायड्रेट करतात. ज्यामुळे तुमची स्किन यूथफुल दिसते.

बदाम तेल लावण्याच्या दोन पद्धती आहेत

बदान तेल चेहऱ्याला लावण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. हे तेल फार हेवी असतं त्यामुळे हे तेल दिवसा कधीच लावू नये. दिवसा चेहऱ्यावर डस्ट पार्टिकल्स बसल्याने तुमचा चेहऱ्या फार विचित्र दिसू शकतो.त्यामुळे हे तेल लावण्याच्या योग्य पद्धती माहिती असायला हव्यात.

बदामाचे तेल रात्री लावावे

रात्री झोपताना बदामाच्या तेलाची हलकी मॉलिश चेहऱ्याला केल्याने त्वचा आतून हायड्रेट होते.तसेच मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं. ज्यामुळे तुमची स्किन यंग आणि युथफूल दिसेल. तसेच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो सुद्धा येईल.

झोपेतून उठल्यावर लावावे

जर तुम्ही सकाळी लवकर उठत असेल तर चेहरा फेसवॉशने क्लिन केल्यानंतर बदामाचे तेल दोन्ही हातांवर घेऊन चेहऱ्याला लावा. ही पद्धत फार फायदेशीर होती. दररोज तुम्ही असे केल्यास तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल. (Glowing Skin)

Glowing Skin
Skin Care : आलिया भट्ट घरीच बनवते स्पेशल फेस पॅक, तिचा 'हा' उपाय वाचा अन् मिळवा ग्लोइंग स्किन

बदामात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. यामध्ये केवळ पोषणमूल्ये आणि जीवनसत्त्वेच नसतात तर त्यामुळे पदार्थाला स्वाद येतो. गोड पदार्थांमध्ये बदाम खूपच छान लागतात. बदामाला सुक्या मेव्याचा राजा म्हणूनही ओळखले जाते. (Skin Care)

कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, बदामात असतात. स्मृतिभ्रंश, विस्मरण या आजारांसाठी बदाम उपयुक्त आहे. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषध व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास बदामाची मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com