Anti Aging Tips : तुम्हालाही 'ए जाते हुवे लम्हो जरा ठेहरो' म्हणावसं वाटतं का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anti Aging Tips

Anti Aging Tips : तुम्हालाही 'ए जाते हुवे लम्हो जरा ठेहरो' म्हणावसं वाटतं का?

Anti- Aging Foods : सर्वांनाच आपण तरूण दिसावं असं वाटत असतं. पण वाढत्या वयाला आणि वेळे ला कोणी थांबवू शकत नाही. अशावेळी 'ए जाते हुवे लम्हो जरा ठेहरो' असं म्हणावसं वाटतं. वयाला थांबवणं आपल्या हातात नसलं तरी आता तरूण दिसणं मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. कसं ते जाणून घ्या.

हेही वाचा: Winter Beauty Tips : Vaseline फक्त स्कीनसाठीच नाही तर केसांसाठीही उपयुक्त

जर ४०-५० च्या वयात ३०-३५ वर्षांचं दिसायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. कारण याचा थेट परिणाम फक्त आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही पडतो. फार जास्त तेलकट, मसालेदार आणि जंक फूड खाल्याने त्वचा वेळे आधीच म्हातारी वाटू लागते. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर आहारात भाज्या, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ आणि सुकामेवा वाढवायला हवेत.

हेही वाचा: Beauty Tips : ऐश्वर्या रॉयसारखे ग्लॅमरस दिसायचंय ? जाणून घ्या तीचे ब्युटी सिक्रेट

यांचा होतो विशेष फायदा

बदाम

बदाम व्हिटॅमिन इ चा उत्तम स्रोत आहे. ज्यामुळे घातक यूवी किरणांपासून संरक्षण होतं. यांमुळं स्कीनचं मॉईश्चर राखलं जातं आणि स्कीन टिश्यू रिपेअर केले जातात. तरूण आणि चमकदार त्वचाच सौंदर्याचं प्रतिक मानलं जातं.

हेही वाचा: Beauty Tips : 'या' ५ उपायांनी घराच्या घरी घालवा पिंपल्स

काजू

काजूत प्रोटीन आणि व्हिटॅमिन इ भरपूर प्रमाणात असतं. हे दोन्हीपण घटक वाढत्या वयाचा परिणाम कमी करतात. आणि त्वचेची चमक कायम ठेवायला मदत करतात. त्यामुळे प्रमाणात काजू खाणं चांगलं असतं.

अक्रोड

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड असतं. ज्यामुळे त्वचा मऊ बनते. आणि रंग उजळतो. याशिवाय अकरोडमधले अँटी ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी करतात. त्यामुळे एजिंग प्रक्रिया स्लो होते.

हेही वाचा: Beauty Tips : चेहऱ्याला Bleach करताय? सावधान, जळू शकते त्वचा

पिस्ता

पिस्त्यात व्हिटॅमिन इ आणि अँटी ऑक्सिडंट असतं. ज्यामुळे फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी होतो. आणि त्वचा सॉफ्ट, ग्लोइंग होते.