Beauty Tips : ऐश्वर्या रॉयसारखे ग्लॅमरस दिसायचंय ? जाणून घ्या तीचे ब्युटी सिक्रेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Tips

Beauty Tips : ऐश्वर्या रॉयसारखे ग्लॅमरस दिसायचंय ? जाणून घ्या तीचे ब्युटी सिक्रेट

पुणे : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला आजही विश्वसुंदरी म्हटले जाते. कारण ती आजही अगदी फिट, फाइन आणि तितकीच सुंदर आहे. आजही ती तरूणांच्या मनावर राज्य करते. ४७ वर्षांतही ऐश्वर्या स्वत:ला फिट ठेवते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती डाएट आणि योगाला प्राधान्य देते. ऐश्वर्याला जिममध्ये वर्कआउट करणे फारसे आवडत नाही त्यामुळे ती डायटवर अधिक भर देते.

फिट राहण्यासाठी ती सर्व स्टार्सप्रमाणे तीही फिटनेस रूटीन फॉलो करते. ब्युटी एक्सपर्टच्या सल्ल्यानूसार ती सौंदर्याची काळजी घेते. नैसर्गिक स्किनकेअर दिनचर्याचे पालन करते. तिचे सौंदर्य, स्किनकेअर, डायट आणि फिटनेसचे सिक्रेटेस पाहुयात.

ऐश्वर्याचे फिटनेस टिप्स

ऐश्वर्या नेहमी ऑयली फूड, जंक फूड, पॅक असलेले पदार्थ, ड्रिंक आणि धूम्रपान यापासून दूर राहते. भरपूर फळे आणि भाज्या खाते. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी घरी बनवलेले जेवण आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य देते. तूम्हालाही तिच्यासारखे निरोगी आणि फिट रहायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

त्वचेसाठी घरगुती पॅक्स

ऐश्वर्यासारखी प्रसिद्ध स्त्री त्वचेसाठी घरगुती पॅक्स वापरते हे ऐकून आश्चर्य वाटेल. या पॅकमध्ये ती बेसन, दूध आणि हळदी यांचे मिश्रण एक्सफोलिएंट म्हणून वापरते. तिच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी ती दह्याचा वापर करते. तर ताज्या काकडीचा फेस मास्क लावते.

मेकअप सिक्रेट

ऐश्वर्या टोन्ड डाउन मेकअप करते. तिच्या लीप्सवर गुलाबी, पीच लिपस्टीक तर गालावर लाइट ब्राऊन कलरचे हायलायटर वापरते. कारण तीच्या चेहऱ्यासाठी ते परफेक्ट आहे. अनेकदा कान्स फेस्टीव्हलमध्ये सहभागी होताना ती हटके लुक करते. त्या लुकची चर्चा परदेशातही होते.

डायट प्लॅन

ऐश्वर्याच्या हेल्दी स्कीन आणि सुडौल शरीरामागील सिक्रेट तिचे डायट आहे. ती फॅट असलेल्या खाद्यपदार्थासून दूर असते. तीच्या आहारात उकडलेल्या भाज्या अधिक असतात. ती नेहमी ब्राऊन राईस खाते. फायबर युक्त पदार्थ खाल्ले की शरीरात चरबी कमी होते त्यामुळे ती फायबर असलेले पदार्थ अधिक खाते. एकदम पोटभर खाल्याने आपले वजन वाढते त्यामुळे ती दिवसातून थोड्या थोड्या प्रमाणात जेवते.

ऐश्वर्याला आवडत नाही जीम

फिटनेस मेंटेन रहावा यासाठी सगळेच जीमला जातात. त्याचे व्हिडीओही व्हायरल करतात. पण, या जमान्यातही ऐश्वर्या जीमला नाही जात. ती योगा आणि मॉर्निंग वॉकला प्राधान्य देते.