मैत्रीचे घट्ट बंध

मैत्री म्हणजे बिनशर्त प्रेम आणि पूर्ण विश्वास असे म्हणणारी मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आणि तिची मैत्रीण आसावरी फातरर्फेकर यांची गोष्टदेखील भारी आहे.
anushka pimputkar and asavari fatarpekar
anushka pimputkar and asavari fatarpekarsakal

- अनुष्का पिंपुटकर / आसावरी फातर्फेकर

मैत्री म्हणजे बिनशर्त प्रेम आणि पूर्ण विश्वास असे म्हणणारी मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आणि तिची मैत्रीण आसावरी फातरर्फेकर यांची गोष्टदेखील भारी आहे. कॉलेजमध्ये झालेली त्यांची मैत्री आज ८ वर्षे झाली, तरी अजून घट्ट आहे. याबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली, ‘‘मी आणि आसावरी एकाच कॉलेजमध्ये होतो. आम्ही एकमेकांच्या पुढे- मागे बसायचो. तिथेच आमची पहिली ओळख झाली. त्यानंतर आमचा मित्र- मैत्रिणींचा एक मोठा ग्रुप तयार झाला.

त्यावेळी आम्ही सर्वांनी खरंच कॉलेज लाईफ खूप जास्त एंजॉय केलं. ग्रुपमध्ये माझा आसावरीशी खूप चांगला बॉंड झाला होता. आम्ही बऱ्याचदा लेक्चर बंक करून तिची गाडी घेऊन बाहेर फिरायलादेखील गेलो होतो. आमची एक खास गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र असतो आणि बाहेर फिरायला जातो, तेव्हा ‘मोमोज आणि कोल्ड कॉफी’ हे आमचं ठरलेलं आहे. म्हणजे आम्ही भेटलोय आणि कोल्ड कॉफी किंवा मोमोज खाल्लंच नाही असं होऊच शकत नाही.’

स्वभावाविषयी अनुष्का म्हणाली, ‘‘आसावरी कोणतीच अपेक्षा न ठेवता समोरच्यासाठी काहीही करायला नेहमीच तयार असते. अत्यंत सालस आहे ती. मात्र, तिची चूक नसताना जर तिला कोणी काही बोललं, तर ती स्वतःसाठी स्टँडदेखील घेते. एकूणच सांगायच झालं, तर ‘जशास तसे’ अशी वर्तवणूक आहे तिची.

ती सहसा कोणाला दुखवत नाही; पण अनवधानानं कधी कोणी दुखावलं गेलं, तर त्या व्यक्तीला मनवण्याचं टॅलेंट तिच्याकडे आहे. तिची मला आवडणारी गोष्टी म्हणजे, तिचं हेल्पिंग नेचर. ती माझी आईसारखी काळजी घेते. माझ्या घरचेदेखील म्हणतात, ‘तू आसावरीसोबत आहेस नं मग ठीक आहे.’ म्हणजे मी तिच्यासोबत असल्यानंतर त्यांनासुद्धा माझी काहीच काळजी नसते.’

आसावरी सांगत होती, ‘‘अनुष्काला पाहिल्यावर सगळ्यांनाच असं वाटतं, की ती खूप लहान मुलींसारखी वागते, बालिश आहे; परंतु ती तशी नाहीये. ती लहान मुलांसारखी निरागस नक्कीच आहे; पण तेवढीच ती मॅच्युअरही आहे. मला जेव्हा तिची गरज असते, तेव्हा ती माझ्यासाठी नेहमीच उपलब्ध असते. बऱ्याचदा तर मी तिला अशा वेळी कॉल केला आहे, ज्यावेळी खरंतर तिनं माझा कॉल उचलला नाही पाहिजे.

मी अनेकदा रात्री बारा वाजतासुद्धा तिला कॉल करते आणि ती झोपली असली, तरीसुद्धा त्या वेळी माझा कॉल उचलते आणि मग गप्पा मारते. तिचा समंजसपणा खरंच वाखाणण्याजोगा आहे. बऱ्याचवेळा तिच्या कामामुळे ती मला वेळ देऊ शकत नाही; पण तो वेळ सोडून ती माझ्यासाठी नेहमीच उपलब्ध असते.

उदाहरणार्थ, ती शूट करत असते, तेव्हा मध्ये तिला पाच मिनिटांचा ब्रेक मिळाला तर मग ती मला कॉल करते आणि सांगते ‘माझ्याकडे ५ मिनिटं आहेत. आपण बोलूया तोपर्यंत.’ अशा प्रकारे ती कधीच मला अंतर देत नाही. मला असं कधीच वाटू देत नाही की ती नाहीये माझ्यासोबत.’

अनुष्का म्हणाली, ‘अलीकडे बऱ्याचदा माझ्या बिझी शेड्यूलमुळे मला तिला वेळ देता येत नाही. अगोदर जसं आमचं भेटणं व्हायचं तसं होत नाही. तिच्या बाजूनं मात्र ती नेहमीच १०० टक्के उपलब्ध असते. मला ते शक्य होत नाही, याची माझ्या मनात बऱ्याचदा खंत असते. अनेकदा तिचा कॉल येतो आणि काही कारणांमुळे माझ्याकडून तो मिस होतो आणि मग दोन दिवसांनंतर वगैरे मला आठवतं, की आसावरीला कॉल केला पाहिजे.

मी अशी अत्यंत विसराळू आहे; पण तरीसुद्धा ती मला समजून घेते आणि गोष्ट खरंच माझ्यासाठी खूप खास आहे. तिचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी झाला आणि तो मी विसरले. तिनं माझी वाट पाहिली आणि शेवटी मला कॉल केला आणि विचारलं, की ‘तू काही विसरली आहेस का?’ तेव्हा खरंच मला आठवतच नव्हतं.

मग शेवटी तिनंच सांगितलं, की तिचा वाढदिवस आहे आणि मी पूर्ण ब्लॅंक झाले. मला काहीच समजत नव्हतं, की आता काय करू. मग मी तिला म्हणाले, की मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं सरप्राइज प्लॅन करत आहे. तेव्हा ती ओके म्हणाली. आता हा इंटरव्ह्यूच मी तिला गिफ्ट देणार आहे. जे पाहून ती नक्कीच खूप खूश होईल.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com