Apple जेवढं फायदेकारी तेवढंच जीवघेणं! मुलांना खायला देताना घ्या विशेष काळजी, तुम्हीही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple Benefits & Disadvantage

Apple जेवढं फायदेकारी तेवढंच जीवघेणं! मुलांना खायला देताना घ्या विशेष काळजी, तुम्हीही...

Apple Side Effects: फळे खाणे आरोग्यासाठी फायदेकारक असते. सफरचंद खाण्याबाबत डॉक्टरही सल्ला देत असतात. जो व्यक्ती रोज एक सफरचंद खातो तो सगळ्या आजारांपासून दूर असतो. सफरचंद हे विटॅमिन्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंटपूर्ण असते. आपल्या शरीराला रोगापासून दूर ठेवण्यास मदत करते. जास्तीत जास्त लोक सफरचंदातील बिया काढूनच सफरचंद खात असतात. मात्र अनेकजण असेही आहेत की चुकून त्यांच्याकडून बिया तोंडात गेल्यात की त्यासहच सफरचंद खातात. असे केल्यास जीवही गमवावा लागू शकतो. लहान मुलांकडे याबाबत विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.

यात काही शंका नाही की सफरचंद शरीरासाठी उपयुक्त आणि फायदेशीर आहे. पण सफरचंदने नेमकं नुकसान कधी हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. सफरचंदाच्या बियांमध्ये एमिग्डलिन नावाचा एक कंपाऊंड असतो जो सगळ्यात विषारी असतो. हा कंपांऊंड बियांच्या आत असतो. बियांच्या सुरक्षेसाठी त्यावर एक लेयर असते. या बिया गिळल्यास शरीराच्या आतही ही लेयर ब्रेक होत नाही. त्यामुळे शरीराला त्याचे नुकसान होत नाही. मात्र जर का तुम्ही या बिया चाऊन खाल्ल्यात तर एमिग्डलिन कपाऊंडचं रूपांतर हायड्रोजन सायनाइ़डमध्ये होते. जे मानवी शरीरासाठी हानिकारक आहे. याचे प्रमाण जास्त झाल्यास माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.

हेही वाचा: Apple Benefits : सफरचंद कोणत्या वेळी खावं? तज्ज्ञ सांगतात सफरचंद रात्री खावं का?

असे असते प्रमाण

सफरचंदाच्या प्रत्येक बियांमध्ये ०.६ मिलिग्राम हायड्रोजन सायनाइड असते. अर्थात तुम्ही ८०- ते ५०० बिया खाल्ल्यास तुमचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सफरचंद खातानाच तुम्ही त्याच्या बिया काढलेल्या कधीही उत्तम ठरेल. मुले चुकून जास्त प्रमाणात या बिया खाऊ शकतात. तेव्हा त्यांच्याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे.

Web Title: Apple Seeds Side Effects If You Eat More Apple Seeds It Can Give Death Harm Dangerous Poison For Kids

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :appleBenefits