फॅशन टशन : लॉकडाउन फॅशन

Fashion
Fashion

लॉकडाउन सुरू असल्यानं सर्वजण सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह झाले आहेत. कोणी छान रेडी होऊन ‘एफबी’, ‘इन्स्टा’ लाइव्ह करीत आहेत, तर कोणी दररोज नवनवीन टिकटॉक व्हिडिओसाठी ग्लॅमरस अवतार धारण करत आहेत. सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग वाढविण्यासाठी चांगलं दिसणं अनिवार्य आहेच, त्यामुळं लॉकडाउनमधील काही प्रसिद्ध फॅशन ट्रेन्डची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

लॉकडाउन सुरू झाल्यापासून सोशल मीडियावरील विविध चॅलेंजेसनं सर्वांना चक्रावून सोडलंय. सध्या एक चॅलेंज आवडीनं स्वीकारलं जातंय ते म्हणजे पीलो चॅलेंज. हो पीलो. यात उशी कंबरेला एका बेल्टच्या सहाय्यानं बांधून तुम्ही त्याचा छान ऑफशोल्डर वन पीस तयार करू शकता. ही स्टाइल सध्या सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. यावर उंच हिल्स कमाल दिसतात. गायिका नेहा कक्कड, तमन्ना भाटीया यांनी नुकताच पीलो स्टाइलमध्ये आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांना ही स्टाईल घरातल्या घरात फोटो शूटसाठी ट्राय करून बघायला काही हरकत नाही. तसेच बोट नेक क्रॉप टॉपची फॅशन सध्या इन आहे. यावर हाय बन मस्त दिसतो. आणि हो, तुमचे केस कर्ली असल्यास सोनेपे सुहागाच. या टॉपवर कर्ली केस छान दिसतात. 

होम क्वारंटाईनमध्ये सोशली लाइक्सवर लाइक्स मिळविण्यासाठी व्हाईट टी-शर्ट, ॲनिमल प्रिंट, डेनिम स्कर्ट, कोल्ड शोल्डर टी-शर्ट, ओव्हर साईज टी-शर्ट, डेनिम जॅकेट्स, डंगरी, हॉट पॅन्ट, मॅक्सी ड्रेसला प्राधान्य दिल जातंय.

फॅशन आणि लाइक्स 
1) सकाळी-सकाळी सोशल मीडियावर लाईव्ह किंवा फोटो टाकणार असाल, तर पिवळ्या रंगाला प्राधान्य द्या. 
2) लॉकडाउनमध्ये विशिष्ट रंगच परिधान केले जात आहेत. यात पिवळा रंग तर आहेच, सोबत पांढरा, काळा आकाशी रंगांचाही समावेश आहे. 
3) रात्री ग्रुप व्हिडिओ चॅटिंगचा प्लॅन असेल, तर विविध कार्टूनच्या डिझाईनमधील कलरफुल नाईट वेअर टी-शर्ट पायजमा चांगला दिसेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com