योजना : सन्मानाचे ‘बचतपत्र’

देशातील महिलांचा सन्मान अधिक उंचाविण्यासाठी आणि त्यांचे नावे आर्थिक बचत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘महिला सन्मान बचतपत्र’ योजना आणली.
savings note of honor
savings note of honorsakal

देशातील महिलांचा सन्मान अधिक उंचाविण्यासाठी आणि त्यांचे नावे आर्थिक बचत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘महिला सन्मान बचतपत्र’ योजना आणली. राष्ट्रीय अल्पबचत गुंतवणूक योजनेत यापूर्वी कधीही नसणारी महिलाकेंद्रित अशी ही योजना आहे. फेब्रुवारी २०२३मध्ये ही योजना घोषित करण्यात आली आणि आता महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान वाढविण्याबरोबरच त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठीची ही योजना ठरत आहे.

महिला आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा ‘महिला सन्मान बचतपत्र’ या योजनेमागील उद्देश आहे. या योजनेत फक्त महिलाच त्यांच्या नावे किंवा लहान मुलींच्या नावे त्यांचे पालक गुंतवणूक करू शकतात. हे बचतपत्र दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. दोन बचतपत्रांत तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधी असता कामा नये. अल्पबचत योजनेअंतर्गत महिलांसाठी असणारा हा एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. किमान कालावधीत उत्तम परतावा देणारी ही योजना आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

  • ही योजना १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत कार्यान्वित राहील.

  • चक्रवाढ व्याज पद्धतीने ७.५ टक्के दराने व्याज मिळेल.

  • कुटुंबातील प्रत्येक महिलेला योजनेचा लाभ घेणे शक्य.

वयाचे बंधन आहे का?

नाही. या योजनेसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही वयोगटातील महिला यात पैसे गुंतवू शकते. लहान मुलीच्या नावे तिचे पालक गुंतवणूक करू शकतात.

किती गुंतवणूक करणे शक्य?

  • किमान एक हजार रुपये

  • कमाल दोन लाख रुपये

रक्कम कधी काढता येईल?

एखाद्या महिलेने पैसे गुंतविले, तर ते परत काढण्यासाठी दोन वर्षांचा ‘लॉक इन’ कालावधी आहे. परंतु दुदैवाने संबंधित महिलेचे निधन झाल्यास ‘नॉमिनी’ असणारी व्यक्ती पैसे काढू शकते. किंवा काही आर्थिक अडचण निर्माण झाल्यास मुदतपूर्ती अगोदर किमान एक वर्षांनी बचतपत्र धारकास पैसे काढता येतात; परंतु या योजनेअंतर्गत खात्यातील मुद्दल आणि जमा झालेल्या व्याजासह शिल्लक असलेल्या रक्कमेच्या केवळ ४० टक्के रक्कम मुदतीपूर्वी काढता येते.

योजनेअंतर्गत व्याज किती?

योजनेअंतर्गत गुंतविलेल्या रक्कमेवर चक्रवाढ व्याज पद्धतीने ७.५ टक्के दराने व्याज मिळते.

‘बचतपत्र’ कसे काढता येईल?

  • पोस्ट ऑफिस

  • सरकारी बॅंका

  • ठरावीक खासगी बॅंका

(संकलन : मीनाक्षी गुरव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com