फॅशन कानमंत्र : व्यक्तिमत्त्व खुलण्यासाठी...

स्वतःचं व्यक्तिमत्त्व मस्त दिसावं, पाहताक्षणी ‘इंप्रेशन’ पडावं असं सगळ्यांनाच वाटतं. फॅशनचा सोसही अर्थातच प्रत्येकाला असतो; पण ती प्रभावी ठरण्यासाठी काही सोपे कानमंत्र लक्षात ठेवायला हवेत.
Personality Development
Personality Developmentsakal

स्वतःचं व्यक्तिमत्त्व मस्त दिसावं, पाहताक्षणी ‘इंप्रेशन’ पडावं असं सगळ्यांनाच वाटतं. फॅशनचा सोसही अर्थातच प्रत्येकाला असतो; पण ती प्रभावी ठरण्यासाठी काही सोपे कानमंत्र लक्षात ठेवायला हवेत.

  • कोणतंही व्यक्तिमत्त्व प्रभावी ठरतं ते त्याच्या बाह्य सौंदर्यावरून हे जितकं खरं, तितकंच त्याचा पाया स्वच्छतेवरही रचलेला असला पाहिजे. त्यामुळे कपडे स्वच्छ, नीटनेटके असले पाहिजेत आणि विशेषतः पादत्राणेसुद्धा अतिशय स्वच्छ असली पाहिजेत, ही अगदी बेसिक गोष्ट विशेषतः तरुणांनी लक्षात ठेवावी. फुल शर्ट घालणार असलात, तर इस्त्री केलेलेच असावेत.

  • फॅशन करताना ‘हाय फॅशन’च प्रभावी ठरते असं काही नाही. अतिशय साधी, सोपी; पण विचारपूर्वक केलेली फॅशन समोरच्यावर छान छाप पाडते. तरुणांसाठी जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्‌स शूज किंवा क्रॉक्स हा एकदम छान पोशाख असतो. निळ्या जीन्सवर कोणतेही टी-शर्ट शोभून दिसतात. शक्यतो आऊटडोअर काम असेल, तर गडद रंगांचे टी-शर्ट छान दिसतील. बराच वेळ सभागृहात, वर्गात वावरणार असलात, तर फिकट रंगांचे टी-शर्ट परिधान करा. टी-शर्ट निवडताना त्यांच्यावर नक्की काय लिहिलं आहे, कोणती चित्रं आहेत ते नीट बघा. लोक बऱ्याचदा त्या मजकुराला किंवा चित्रांना तुमच्याशी रिलेट करत असतात, त्यामुळे शक्यतो दोन्ही गोष्टी मिळत्याजुळत्या असाव्यात.

  • काळी ट्राऊझर आणि वर फिकट रंगाचा फुल शर्ट असा वेश कोणत्याही फॉर्मल ठिकाणी शोभून दिसतो. फॉर्मल वेअर परिधान करताना इस्त्री कंपल्सरी. डार्क रंगाचा शर्ट आणि फिकट रंगाची ट्राऊझरही खूप छान दिसते. हा पॅटर्न जास्त खुलून दिसतो. फॉर्मल वेअर परिधान करणार असलात, तर तिथे शूज कंपल्सरी. सॅंडल्स, क्रॉक्स, चपला पूर्ण टाळा.

  • कपड्यांबरोबर पादत्राणे खूप महत्त्वाची असतात. अनेक जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे इंप्रेशन चुकीचे पडते. चपला किंवा सॅंडल्सपेक्षा शूज जास्त शोभून दिसतात. शूजचे दोन-तीन किंवा जास्त जोड आपल्याकडे असावेत. कपड्यांमध्ये वैविध्य असले आणि शूज मात्र तेच असले तर ते बोअरिंग वाटतं.

  • मुलांसाठी ॲक्सेसरीज गेल्या काही काळात आल्या आहेत. त्यात रिस्ट वॉच खूप महत्त्वाचं. वेळ बघायला नव्हे, तर स्टाइल स्टेटमेंट म्हणून रिस्ट वॉचचा उपयोग करा. नुसत्या हातांपेक्षा रिस्ट वॉच असलेला हात हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक गेटअप देतो. घड्याळांचेही काही प्रकार असल्यास उत्तम. हल्ली रिस्ट बँडचेही खूप प्रकार उपलब्ध झाले आहेत. तेही घालून तुम्ही व्यक्तिमत्त्वात वैविध्य आणू शकता.

  • बॉडी स्प्रे हा अंगाला दुर्गंधी येऊ नये म्हणून आवश्यक असला, तरी त्याचा अतिरेक टाळा. खूप जास्त प्रमाणात बॉडी स्प्रेचा वापर केल्यास त्याचा उलटा परिणाम होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com