उद्यमशीलतेसाठी ‘नवीन स्वर्णिमा योजना’

महिलांमधील उद्योजकतेला वाव देण्यासाठी आणि विशेषकरून मागासवर्गीय प्रवर्गातील उद्योजक महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत ‘नवीन स्वर्णिमा योजना’ नव्याने सुरू करण्यात आली आहे.
navin swarnima yojana
navin swarnima yojanasakal

महिलांमधील उद्योजकतेला वाव देण्यासाठी आणि विशेषकरून मागासवर्गीय प्रवर्गातील उद्योजक महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत ‘नवीन स्वर्णिमा योजना’ नव्याने सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिला उद्योग, व्यवसाय सुरू करत असून त्याचे आत्मनिर्भर होण्याकडे सकारात्मक पाऊल पडत आहे.

या योजनेद्वारे महिलांना उद्योगासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेद्वारे महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्सस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनबीसीएफडीसी) यांच्याद्वारे अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

‘महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे’ हा योजनेचा उद्देश आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये देशातील एकूण सहा हजार १९३ महिलांनी, तर २०२१-२२ मध्ये सात हजार ७६४ महिलांनी, तर २०२२-२३मध्ये पाच हजार ५७३ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. केरळमधील महिलांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ मागील तीन वर्षांत घेतला आहे. त्याखालोखाल पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर या राज्यांमधील महिलांचा समावेश आहे.

योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार महिला भारतातील रहिवासी असावी

  • अर्जदार महिलेचे वय १८ ते ५५ वर्ष या दरम्यान असणे अनिवार्य

  • लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, बॅंक खाते, रहिवासी पुरावा, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://nbcfdc.gov.in/loan-scheme-description/2/en

(संकलन : मीनाक्षी गुरव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com