यशोदा माता अंगतपंगत उपक्रम

गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना मनमोकळा संवाद साधता यावा म्हणून गावागावांमध्ये ‘यशोदा माता अंगतपंगत’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
pregnant women
pregnant womensakal

गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना मनमोकळा संवाद साधता यावा म्हणून गावागावांमध्ये ‘यशोदा माता अंगतपंगत’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वत्र पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येते. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार गरोदर महिलांची अपेक्षित वजनवाढ होणे, त्यांना लोहयुक्त, फॉलिक ॲसिड गोळ्यांचे सेवन करणे, गरोदर महिलांच्या हिमोग्लोबिन प्रमाणामध्ये वाढ होणे, नोंदणीकृत गरोदर महिलांच्या कमीत काम चार आरोग्य तपासण्या करणे, यासाठी दैनंदिनरीत्या अंगणवाडी सेवांद्वारे उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक बाल विकास योजनेची यंत्रणा कार्यरत आहे.

काही वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये पोषण अभियानासंबंधी ‘अंगतपंगत’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची दखल घेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मार्च २०२० मध्ये घेण्यात आला. त्यानुसार, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रकल्पातील अंगणवाडी केंद्र स्तरावर ‘यशोदा माता अंगत-पंगत उपक्रम’ राबविण्यात येत आहे.

अशी होते अंमलबजावणी

  • सर्व नोंदणीकृत गरोदर महिला स्वत: स्वगृही तयार केलेला मध्यान्ह आहार जेवणाचा डबा घेऊन अंगणवाडी केंद्रात पोचतील.

  • अंगणवाडी केंद्रात पोचलेल्या सर्व गरोदर महिला अंगतपंगत पद्धतीने एकत्रित सहभोजनाचा आस्वाद घेतील

  • याद्वारे गरोदर महिला आपापसात होणारे शारीरिक बदल, वजनवाढ, उद्‌भवणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना, आरोग्य तपासण्या, पौष्टिक आहार याबाबत चर्चा करतील.

  • गरोदरपणामध्ये करायच्या तपासण्या, रक्तवाढीच्या लोहयुक्त गोळ्या, व्हिटॅमिन डी, जंतुनाशक गोळ्या, विश्रांती याबाबत संवाद साधतील.

  • इतर गरोदर सखींसमवेत मनमोकळ्या गप्पा गोष्टी करणे.

‘यशोदामातां’च्या सेवेसाठी

  • अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्यसेविका समुपदेशन करतील.

  • समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका यांनी त्यांच्या फिरती कार्यक्रमात ‘अंगतपंगत’ उपक्रमाला भेट देऊन गरोदर महिलांची संवाद साधणे.

  • जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी केंद्र पातळीवर संबंधित कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी करणे.

  • जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांनी समन्वयाने हा उपक्रम राबवणे आवश्यक.

(संकलन : मीनाक्षी गुरव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com