Ashadhi Ekadashi 2024 : पंढरीतल्या चंद्रभागेत आहे दगडाची तरंगणारी नौका, तुम्ही पाहिलीय का?  

Ashadhi Ekadashi story:पुंडलिक मंदिरासमोर लोहदंड तीर्थ आहे कि त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगते. हा ही देवाचा एक चमत्कारच आहे.
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024esakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2024:

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी दहा लाखाहून अधिक भाविकांची पंढरीत गर्दी झाली आहे. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये बाळगून आळंदी आणि देहूवरून पायी चालत निघालेल्या ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांनी पंढरीत प्रवेश केला.

गेली २० दिवस देवाचा धावा करत प्रवास करणारे वारकरी पंढरीनाथाच्या पायावर डोकं ठेऊन धन्य होतात.

पंढरपुरात गेलं की चंद्रभागेत अंघोळ करण्याची प्रथा आहे. आणि नदीत अंघोळ केल्यानंतर भक्त पुंडलिकांचे दर्शन घेऊन मगच विठोबाच्या मंदिराकडे जाता येत.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2023 : येथे आहे विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांचे एकाच देव्हाऱ्यात मंदिर!

वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला आद्य स्थान आहे. भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात.

पुंडलिक मंदिरासमोर लोहदंड तीर्थ आहे कि त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगते. हा ही देवाचा एक चमत्कारच आहे. त्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते कि, गौतम ऋषींची पत्नी सती अहिल्या हिचे इंद्राने गौतम ऋषींचे रूप घेऊन सतित्व हरण केले. गौतम ऋषींनी पत्नीला शिळा होण्याचा व देवेंद्राला सहस्त्र छिद्राने पीडित होण्याचा शाप दिला. अहिल्येला उःशाप मिळून भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शाने ती पावन झाली.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2023 : येथे आहे विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांचे एकाच देव्हाऱ्यात मंदिर!
पुंडलिक मंदिरासमोर लोहदंड तीर्थ आहे कि त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगते
पुंडलिक मंदिरासमोर लोहदंड तीर्थ आहे कि त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगतेesakal

इंद्र भगवान विष्णूंना शरण गेला. विष्णूंनी त्याच्या हाती एक लोहदंड दिला व तीर्थयात्रा करण्यास सांगितले आणि 'ज्या तीर्थात हा लोहदंड तरेल त्या तीर्थाच्या स्नानाने तुझी छिद्रे जातील' असा वर दिला. अनेक तीर्थे भ्रमण केल्यानंतर देवेंद्र या तीर्थाजवळ आला.

इथे लोहदंड तरला. हर्षित झालेल्या इंद्राने या तीर्थात स्नान केले. तो शापमुक्त झाला आणि व्याधिमुक्त झाला. म्हणून या तीर्थास 'लोहदंड तीर्थ' हे नाव पडले.

पुंडलिक मंदिराबाजूला असलेली तो पाषाण म्हणजे दगडी नाव. ती पाहण्यासाठी भाविकांबरोबर देश विदेशातून अभ्यासकही येतात.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2023 : आज आषाढीचा गजर; प्रतिपंढरपूर बाळदेत पायी पालखी सोहळा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur Set for Major Upgrade; CM Orders Completion Within 2.5 Years
Eknath Shinde announcing development plans for Pandharpur and welcoming new leaders into Shiv Sena.
Preparations underway for Ashadhi Wari with modern German hangars planned at palkhi halt points.
VIP darshan ban dates Pandharpur temple March April
Marathi News Esakal
www.esakal.com