Ashadhi Ekadashi 2026: भक्ती अन् निसर्गाचा अद्भुत मिलाफ ! आषाढी एकादशीला दोनवड्यात रंगले चिमण्यांचे 'विठ्ठल रिंगण'; Video Viral

ASHADHI EKADASHI SPARROWS VITTHAL RINGAN VIDEO: आषाढी एकादशीच्या पावन दिवशी कोल्हापूरच्या दोनवडे गावात हजारो चिमण्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीभोवती सजीव 'विठ्ठल रिंगण' साकारत भक्ती आणि निसर्गाचा अद्भुत मिलाफ घडवला.
Thousands of Sparrows Create a Divine 'Vitthal Ringan' on Ashadhi Ekadashi in Kolhapur; Viral Video Wins Hearts

Thousands of Sparrows Create a Divine 'Vitthal Ringan' on Ashadhi Ekadashi in Kolhapur; Viral Video Wins Hearts

sakal

Updated on

NATURE MEETS DEVOTION ASHADHI EKADASHI VIRAL VIDEO: आषाढी एकादशीची पहाट... विठूरायाच्या नामाचा गजर... आणि पंढरपुरात रंगणारा वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा! पण याच पवित्र दिवशी कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील दोनवडे गावात एक अत्यंत अद्भुत आणि नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. एका बाजूला भक्तीचा मखमली स्वर तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचा अनमोल आविष्कार! येथील पर्यावरणप्रेमी रामचंद्र पवार यांच्या अंगणात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीभोवती तब्बल हजारो चिमण्यांचे जणू 'सजीव रिंगण'च अवतरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com