Ashadhi Wari 2023 : २५० वर्षांनंतर जन्म घेऊनही संत एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट कशी घेतली?

Sant Dnyaneshwar: संत ज्ञानेश्वरांनी घेतलेली संजिवन समाधी नेमकी कशी आहे.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023esakal

Ashadhi Wari 2023 : वारकरी आपापल्या गावातून निघून पायी दिंडीसोबत विठू रायाच्या दर्शनाला जात आहेत. २० ते २२ दिवस चालल्यानंतर विठोबा आपल्याला दिसेल त्याचे चरणस्पर्श करेन या आशेवर तो वारकरी चालत जात आहेत. ना कुटुंबाची काळजी ना शेती, जणावरांची, इतरवेळी बाहेर कुठेही मुक्कामास न थांबणारे शेतकरी, मजूर, काबाडकष्ट करणारे लोक वारीला मात्र हमखास गर्दी करतात.

पांडुरंग पंढरीत नसतोच मुळी तो इथेच आमच्यासोबत चालतो. वारकऱ्यांच्या भेटीला साक्षात पांडुरंगच येतो. तो आमची सेवा करतो असा अनुभव वारकरी सांगतात. पंढरीच्या पायी दिंडीला दोन प्रमुख दिंड्या निघतात.(Ashadhi Wari)

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भुमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधी बरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे या मुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. ज्ञानेश्वरांची समाधी हे आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

वारकरी सांप्रदायात अनेक संत होऊन गेलेत. सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ महाराज होय. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. (पंढरीची वारी)

श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांच्या आजोबांनीच त्यांना सांभाळले. संत एकनाथ यांच्या आयुष्यात अनेक असे दैवी प्रसंग घडले होते. त्यातीलच एक म्हणजे संत एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधून ती पुन्हा उघडून ज्ञानेश्वर माऊलींची भेट घेतली होती.

संत एकनाथ महाराजांना स्वप्नात दृष्टांत झाला होता. या संपूर्ण घटनेवर महाराजांनी अभंगाची रचनाही केली आहे. आजच्या या वारी स्पेशल स्टोरीजमध्ये आपण त्याबद्दलच माहिती घेऊयात.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Ekadashi Wari : पालखीमार्गात भाविकांना स्वच्छता–सुविधांसाठी २१ कोटी रुपये मंजूर

संत ज्ञानेश्वरांनी घेतलेली संजिवन समाधी नेमकी कशी आहे

ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. ही प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली, खोल ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती. संजीवन समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली.

संजीवन समाधीबद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधांबद्दल जोरदारपणे सांगितले आहे.

हिंदू कॅलेंडरच्या कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या १३ व्या दिवशी, आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा एकवीस वर्षांचे असताना संजीवन समाधीत प्रवेश केला. त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे. त्यांच्या निधनाने नामदेव आणि इतर उपस्थितांनी शोक केला.

अनेक वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की, ज्ञानेश्वर महाराज हे अजूनही जिवंत आहेत. संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणी समाधी घेणे असे नाही, तर चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत त्याठिकाणी ब्रह्मभावाने स्थिर राहावे, असा बोध आहे.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Ekadashi 2023 : औरंगजेबाच्या भितीने पुजाऱ्यांनी केला गनिमी कावा, विठ्ठलाची मूर्ती लपवली अन् पूजा सुरू ठेवली!

एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची संजीवकता त्यांच्या चरित्राच्या व वाङ्मयाचेद्वारा स्पष्ट केली आहे. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतात,

श्रीज्ञानदेंवे येवुनी स्वप्नांत।

सांगितली मात मजलागी॥१॥

दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा।

परब्रम्ह केवळ बोलत असें॥२॥

अजान वृक्षाची मुळी कंठास लागली।

येवुनिं आळंदी स्थळी काढ वेगी॥३॥

ऐसे स्वप्न होता आलों अलंकापुरी।

जव नंदी माझारी देखिंले व्दार॥४॥

एका जनार्दनी पूर्व पुण्य फळलें।

श्रीगुरु भेंटलें ज्ञानेश्वर॥५॥

माऊलींच्या समाधीनंतर साधारण अडीचशे वर्षांनी ज्यांचा अवतार झाला होता. मग संत ज्ञानेश्वर अन् संत एकनाथ महाराजांची भेट कशी झाली. याच उत्तर असं की  असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की माऊलींनी मला स्वप्नात येऊन ज्या अजानवृक्षाच्या सान्निध्यात मी समाधी घेतली आहे.  

त्या अजानवृक्षाची मुळी माझ्या कंठास लागली आहे. ती तू येऊन बाजूला कर, असा आदेशच संत ज्ञानेश्वरांनी एकनाथ महाराजांना दिला.

हे कळताच गहिवरुन गेलेले एकनाथ आपल्या बरोबर काही जणांना घेऊन आळंदीकडे त्वरेने रवाना झाले. यावेळी माऊलींनी नाथांना आणखी एक महत्त्वाचं कार्य करायला सांगितलं. ते म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचं.

त्याकाळी हस्तलिखित पोत्थाच वापरत असल्याने एका पोथीवरून दुसरी प्रत लिहून काढताना होणार्या चुका तर होत्याच, पण काही माणसं अशा प्रती तयार करताना हेतुपुरस्सर त्यात स्वत:च्याही मोडक्या तोडक्या ओव्याही घुसडत असत.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Ekadashi 2023 : दर्शनाला आले आणि विठोबालाच सोबत घेऊन गेले, अनेक वर्ष पंढपुरात नव्हता पांडुरंग!

हा स्वप्नदृष्टांत जेव्हा झाला, तेव्हा संत एकनाथ महाराज अलंकापुरी आले. आणि नंदीजवळची शिळा दूर करून ज्ञानेश्वर महाराजांची समाधी जिथे होती तेथे गेले.

तेव्हा दिव्य तेजःपुंज ब्रह्मरूप श्रीगुरू ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाले. त्यांची भेट झाली. पैठण या तीर्थक्षेत्री नाथांच्या कीर्तनाला खूप मोठा जनसमुदाय लोटत असे. पंढरपूर या क्षेत्री देखील त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच प्रिय ठरली होती.

पैठणला परत आल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखीत प्रती जमवल्या. त्यांचा अभ्यास आणि संशोधन केलं, आणि शेवटी नितांत श्रद्धेनं, कष्टानं श्रीज्ञानेश्वरीची निर्दोष प्रत तयार केली. ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणानंतर एकनाथांनी तितक्याच तोलामोलाचं केलेलं दुसरं कार्य म्हणजे ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती केली.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Ekadashi News : पंढरपूरसाठी आषाढी स्पेशल रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com