Pandharpur Secreat Cellars: पंढरीत ज्या मंदिराजवळ भुयार सापडलं त्या संत कान्होपात्रा कोण होत्या?

पंढरीत आहे संत कान्होपात्रेचे झाड
Pandharpur Secreat Cellars
Pandharpur Secreat Cellarsesakal

Pandharpur Secreat Cellars:

गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराची स्वच्छता सुरू आहे. आज या मंदिर परिसरात असणाऱ्या संत कान्होपात्रा यांच्या मंदिराजवळ एक भुयार सापडले आहे. तब्बल सात ते आठ फुट खोल असणाऱ्या या भुयारात काही देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. कान्होपात्रा मंदिराजवळ आज हे भुयार सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या निमित्तानेच आपण संत कान्होपात्रा कोण होत्या, त्यांचे मंदिर आणि कान्होपात्रेचे झाड याबद्दल माहिती घेऊयात.

Pandharpur Secreat Cellars
Pandharpur Secret Cellars: पंढरपुरातील मंदिरात सापडलं तळघरं; काय आहे तळघरात जाणून घ्या?

वारी वारी करता जातो पंढरी,असं म्हणतं वारकरी विठू माऊलीच्या दर्शनाला निघाले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरीला जाण्यासाठी मार्गस्थ झाल्या आहे. पायी चालत जेव्हा दिंड्या गावोगावी जातात. तिथून पंढरपुर आणि विठोबाचं ते सुरेख रूप पाहून वारकरी धन्य होतात.

पण तुम्हाला थोडीही कल्पना नसेल की पंढरपुरात गेल्याने वारी पुर्ण होत नाही. तर, एका वृक्षाचे दर्शन घेतल्यानंतरच वारी पुर्ण झाली असे म्हणतात. पंढरी नगरीत चंद्रभागेतीरी अनेक मंदिरे आहेत. मग वारी पुर्ण होण्याचा मान या वृक्षाला का बरं देण्यात आलाय. याबद्दलच आज माहिती घेऊयात.

विषयाचे संगती नाश पावले निश्चिती।भगे पडिले इंद्राला ।भस्मासुर भस्म झाला।।चंद्रा लागीला कलंक ।गुरू पत्नी रतीला देख।।रावण मुकला प्राणाशी म्हणे कान्होपात्रा दाशी।।

Pandharpur Secreat Cellars
Ashadhi Ekadashi 2022: उपवासाचा ढोकळा कसा करायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

याचा अर्थ असा की, ह्या नुसार स्त्री शक्तीचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचा कसा नाश झाला हे ह्या झाडाचे दर्शनातून शिकावं आणि सुखी व्हावं, असा होतो. हे झाड साधं नाही. तर ते त्यागाचं, अमाप अशा भक्तीचं प्रतिक आहे.  

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत कान्होपात्राची समाधी आहे. या समाधीच्या नजीक जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वीचे जुने तरटीचे झाड आहे. अगदी तेव्हापासून या तरटीच्या झाडाच्या रुपात संत कान्होपात्राला पाहिले जाते.

विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी दर्शन रांगेतील भाविक याचा झाडाचे मोठ्या भक्तीने दर्शन करतात व या झाडाच्या फांदीला मिठी मारून प्रत्यक्ष कान्होपात्रेचे दर्शन झाल्याने कृतकृत्य होतात. दर्शन रांगेच्या अगदी जवळच (हाताच्या अंतरावर) हे तरटीचे झाड असल्याने सर्व भावीक या झाडाला प्रेमाने/मायेने स्पर्श करतात व त्याचे दर्शन घेतात.

Pandharpur Secreat Cellars
Ashadhi Ekadashi 2022: एकादशीच्या दिवशी फराळाला करा खमंग साबुदाणा डोसा

या झाडाचे दर्शन झाल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही अशी वारक-याची धारणा आहे. या वृक्षाचे नाव तरटी म्हणले तर ती म्हणजेच भवसागर तारूण जाण्यास मदत करणारा वृक्ष अशीच भावना प्रत्येक वारक-याची असते.  

निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येक सजीवाला (प्राणी/वनस्पती) एक ठरावीक आयुष्य असते. या निसर्ग नियमाप्रमाणे हे दहा दशकापेक्षा जास्त वर्षापूर्वीचे कान्होपात्राचे म्हणजेच तरटीचे झाड आता पूर्णपणे वटून गेले/वाळून गेले आहे. या ठिकाणी आता फक्त वाळलेल्या फांद्या शिल्लक उरलेल्या आहेत.

सध्या या झाडावर एकही पान दिसत नाही. तरीसुद्धा विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे भाविक कान्होपात्राचं झाड समजून याच वाळलेल्या फांद्यावर डोके ठेवून मनोभावे दर्शन घेतात. कान्हो पात्रेच्या समाधीजवळ हे झाड असल्याने ते कान्होपात्रेचे झाड म्हणूनच ओळखले जाते.

Pandharpur Secreat Cellars
Ashadhi Ekadashi : बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

तरटीचे झाड विदर्भात दुर्मिळ आहे. विदर्भातील जनतेस माहीत आहे ते झाड फक्त पंढरपूरला, पांडुरंगाचे विठे जवळ आहे,आता तिथल झाड हळद कुंकू लावू, लावू साल जळल्या मुळे राहिले नाही, असे ऐकण्यात आहे.पंढरीला जावं विठुरायाच् दर्शन घेताना वृक्षरुपी कान्होपात्रेच दर्शन घ्यावे.

कोण होत्या संत कान्होपात्रा

मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथील गणिकेची मुलगी कान्होपात्रा ही विठ्ठलाची निस्सीम भक्त होती. बिदरच्या बादशहाच्या मनात त्या भरल्या. त्यांना आपल्या दरबारी नर्तकी म्हणून आणावे अशी त्या बादशहाची मर्जी होती. त्याने मोघल सैनिक कान्होपात्रेच्या मागे सोडले होते. दिसेल तिथून पकडून आणा माझ्या समोर हाजिर करा असा फर्मान त्या बादशहाने काढले होते.

हे फर्मान कान्होरात्रेच्या कानी आली. संत कान्होपात्रा या विठ्ठलाच्या निस्सिम भक्त होत्या. विठ्ठल भक्तीत आयुष्य जावं असं त्यांना वाटायचं. पण ऐन तारूण्यात हे मोघलांचे सैनिक मागे लागल्याने कान्होपात्रेने विठ्ठलाचा धावा केला. लपत-छपत विठ्ठलाचे मंदिर गाठले.

मंदिरात विठ्ठलाच्या समोर उभे राहून त्यांनी देवाचा धावा केला. असं म्हणतात की, देवांनीही कान्होपात्रेच्या मागे लागलेल्या सैनिकांचा चांगलाच बंदोबस्त केला. जेव्हा सैनिक चंद्रभागा ओलांडत होते. तेव्हा देवांनी नदीला आदेश दिला आणि चंद्रभागेची पाणी पातळी वाढली. अचानक आलेल्या पुराने रौद्ररूप धारण केले अन् मोघल सैन्य नदीत वाहून गेले.

Pandharpur Secreat Cellars
Ashadhi Ekadashi : ‘आषाढी एकादशी’ महाराष्‍ट्रीयन संस्‍कृती साता समुद्रापार
संत कान्होपात्रा आणि विठ्ठलाचे सुरेख रूप
संत कान्होपात्रा आणि विठ्ठलाचे सुरेख रूपesakal

संकट टळले असले तरी आता विठ्ठलाच्याच चरणी रहावे अशी कान्होपात्रेची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी देवासमोरच देहत्या केला. जिथे त्यांचे कलेवर होते तिथे एका वृक्षाची कोवळी पालवी फुटली. तोच हा कान्होपात्रेचा वृक्ष होय.

तेव्हापासून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात याच तरटी झाडाच्या रूपात कान्होपात्रेला पाहिले जाते. कालांतराने हे झाड वाळून गेले. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही, अशी वारकऱ्यांची धारणा आहे.

या झाडाबाबतीत असंही सांगितलं जातं की, हे झाडं चिरतरूण होतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा पाणगळीच्या ऋतूमध्येही ते टवटवीत असायचं. त्याला १२ महिने २४ तास कोवळी हिरवीगार पाने होती. वारकरी त्या झाडाची पाने पूजेसाठी तोडून न्यायचे.

Pandharpur Secreat Cellars
Ashadhi Ekadashi Wari : पालखीमार्गात भाविकांना स्वच्छता–सुविधांसाठी २१ कोटी रुपये मंजूर

भाविकांच्या श्रद्धेचा व त्यांच्याविषयी असलेल्या भावनांचा विचार करून विठ्ठल मंदिर समितीने येथे पुन्हा तरटीचे रोपण करण्याचा घेतला होता. पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

कान्होपात्रेच्या मंदिरासमोर एक महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्या मंदिराजवळ हे तरटीचं रोपटं लावण्यात आलं होतं. मंदिर प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊनही ते जगल नाही. त्यामुळे मंदिराजवळील मूळ वृक्षाचीच लोक पुजा करतात आशिर्वाद घेतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com