Astro Tips: पुढे तुमच्या आयुष्यात काय होणार? शरीरातील नसेचं तडतडणं देतं चांगले वाईट संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips: पुढे तुमच्या आयुष्यात काय होणार? शरीरातील नसेचं तडतडणं देतं चांगले वाईट संकेत

Astro Tips: जगात एखादाच व्यक्ती असेल ज्याच्या शरीराच्या एकही भागाची नस अजिबात तडतडत नसेल. मात्र शरीराच्या विविध अंगांच्या तडतडण्यामागे शास्त्रात काही कारणे सांगितली आहे, हे तुम्हाला माहिती आहे काय? होय, शरीराच्या विविध भागांची अतिप्रमाणात हालचाल होणे म्हणजे एक प्रकारचे शुभ अशुभ संकेत मिळणे होय. तुम्हाला असे संकेत आढळल्यास तुम्ही वेळेतच सावध झाल्यास तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींचा धोका टळू शकतो.

चला तर जाणून घेऊया शरीरातील विविध अंगाचं फडफडणं काय असतं

उजव्या डोळ्याची नस तडतडणे त्याचा काय असतो अर्थ?

कुठल्याही निरोगी व्यक्तीचा उजव्या डोळ्याची नस तडतडत असेल तर त्याच्या आयुष्यात स्त्री लाभ असतो. आता ही स्त्री व्यक्तीची आई, बहिण किंवा पत्नीही असू शकते.

हेही वाचा: Astro Tips : महिलांनी आंघोळ न करता करू नये हे काम; होतील हे वाईट परिणाम

एखाद्या व्यक्तीला पुत्रप्राप्ती होणार असेल तेव्हा त्याचा डाव्या गालाची नस तडतडते. एखाद्या व्यक्तीचे दोन्ही गाल समान फडफडण्यास सुरूवात होत असेल तर त्याला भरपूर धनलाभ होतो.

एखाद्याची वरच्या ओठाची नस तडतडत असेल तर एखाद्या वादाची आशंका असू शकते. आणि जर का दोन्ही ओठ तडतडत असेल तर सुखद बातमीही मिळू शकते.

हेही वाचा: Astro Tips : तुम्ही वापरत असलेलं चप्पल किंवा बूटही तुमचे भाग्य बदलेलं, कसे पहा

तोंडाच्या भागाची नस तडतडत असेल तर तुम्हाला चविष्ट जेवण मिळू शकतं. हे प्रमाण कमी असल्यास तुम्हाला एखादा नवा मित्रही मिळू शकतो. तुमची जीभही तडतडत असेल तर तुमचं एखाद्याशी भांडणही होऊ शकतं. मात्र विजय तुमचाच होणार.

हेही वाचा: Astro Tips : जपमाळ घेऊन नामस्मरण केल्यास मिळेल आनंद ,जाणून घ्या नियम

हाताला खाज येणे

तुमच्या हाताला खाज येत असेल तर समजावे की तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. डाव्या हाताची नस तडतडत असेल तर रोगी व्यक्तीला धनलाभ होऊ शकतो.