
'ऑडी इंडिया'कडून नवीन 'ऑडी ए८ एल'साठी बुकिंग्जचा शुभारंभ
मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने भारतात त्यांची प्रमुख सेदान नवीन 'ऑडी ए८ एल'च्या (Audi A8 L) बुकिंग्जची सुरूवात केली आहे. ३ लीटर टीएफएसआय इंजिन, ४८ व्होल्ट माइल्ड-हायब्रिड सिस्टिम आणि क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्हचे संयोजन असलेली नवीन ऑडी एल८ एल अतिशय गतिशील आहे. ऑडी एल८ एल १० लाख रुपयांच्या नोंदणी शुल्कासह बुक करता येऊ शकते.
हेही वाचा: ऑडी इंडियाचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून कार महागणार
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, "आज आम्ही आमची प्रमुख सेदान नवीन ऑडी एल८ एलसाठी बुकिंग्जना सुरूवात करत आहोत. ऑडी एल८ एलचे भारतात निष्ठावान चाहते आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की, ही आकर्षक सेदान तिची प्रबळ कामगिरी कायम ठेवेल. नवीन ऑडी एल८ एलला उत्तम मागणी मिळत असतानाही आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमधील प्रमुख कार्सवरील फोकस कायम ठेवत आहोत."
हेही वाचा: Audi Indiaकडून आजपासून 'ऑडी क्यू ५' कारची बुकिंग सुरू
ऑडी एल८ एलमध्ये उच्चस्तरीय लक्झरी, आरामदायीपणा व वैशिष्ट्ये आहेत. नवीन ऑडी एल८ एल विविध सानुकूल पॅकेजेससह सादर करण्यात येईल, ज्यामध्ये रिअर रिलॅक्सेशन पॅकेजसह रिक्लायनर, फूट मसाजर, डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्ससह अॅनिमेटेड प्रोजेक्शन्स आणि इतर अनेक सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. ग्राहक त्यांची वैयक्तिकृत ऑडी एल८ एल बुक आणि कन्फिगर करण्यासाठी त्यांच्या जवळच्या ऑडी इंडिया डिलरशीपशी संपर्क साधू शकतात किंवा www.audi.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
Web Title: Audi India Started Booking Of Audi A8l
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..