Knee Surgery : गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर या गोष्टी टाळा

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने जड वस्तू उचलू नये. रुग्णाचा संपूर्ण भार त्याच्या गुडघ्यावर जाऊ नये म्हणून वॉकरने चालण्याचा सल्ला दिला जातो.
Knee Surgery
Knee Surgerygoogle

मुंबई : खराब आहार आणि खराब जीवनशैलीमुळे हाडांशी संबंधित आजारांची समस्या वाढत आहे. यापैकी बहुतेकांना गुडघेदुखीचा त्रास होतो. काही लोकांचा त्रास इतका वाढतो की उठणे, चालणेसुद्धा नीट होत नाही आणि शेवटी गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागते.

पण असे अनेक लोक आहेत ज्यांना गुडघ्यावर शस्त्रक्रिया करूनही आराम मिळत नाही. असे घडते कारण शस्त्रक्रियेनंतर लगेचच अशा काही गोष्टी केल्या जातात, ज्यामुळे ऑपरेशन नीट होत नाही आणि समस्या आणखी वाढतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊ या. (avoid these activities after knee surgery)

Knee Surgery
Mumbai Bridge : कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणार आणखी एक पूल

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर काय करू नये

वजन उचलणे टाळा - गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने जड वस्तू उचलू नये. रुग्णाचा संपूर्ण भार त्याच्या गुडघ्यावर जाऊ नये म्हणून वॉकरने चालण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, पडण्याची भीती वाटेल अशी कोणतीही क्रिया करू नये असा सल्ला दिला जातो.

वर्कआऊट टाळा - गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर जास्त तीव्रतेचा व्यायाम टाळावा. कारण जर तुम्ही उत्साहात जड वर्कआउट केले तर त्यामुळे गुडघ्यांवर ताण येतो आणि ऑपरेशनमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

याशिवाय असे कोणतेही काम करू नका ज्यावर संपूर्ण शक्ती गुडघ्यावर पडेल. फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकीसारखे खेळ खेळण्यास मनाई आहे. डॉक्टर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर सायकल चालवण्याचा सल्ला देतात.

Knee Surgery
Heart Attack : तरूण वयात हृदयविकाराचा झटका येण्यामागचे कारण सापडले

धावणे टाळा - गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर वेगाने चालणे किंवा धावणे टाळावे. याशिवाय शिडी चढताना जास्त अंतर नसावे. गुडघा वाकवणेदेखील टाळावे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर लगेच जमिनीवर पाय दुमडून बसणे टाळावे.

जास्त वेळ बसणे टाळा - गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर बराच वेळ बसून राहिल्यास रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते. जास्त वेळ बसल्याने पायाच्या खालच्या भागात असलेल्या द्रवावर परिणाम होतो. यामुळे पायांना सूज येऊ शकते.

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर ७ ते १० दिवसांनंतरही ४० ते ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसू नये. जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव बराच वेळ बसला असाल तर एका खुर्चीवर बसा आणि पाय दुसऱ्या खुर्चीवर ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com