आपल्या स्टाईलला वेगळाच लूक देणाऱ्या 'या' पाच वस्तू वापरायला विसरू नका

Be sure to start using some items that will give your style a look.jpg
Be sure to start using some items that will give your style a look.jpg

पुणे : कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपल्याला सामाजिक आणि घरगुती कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे झूम मीटिंग्स आणि वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. कोरोनामुळे काहींच्या लाईफमध्ये तसेच फॅशनमध्येही बरेच बदल झाले आहेत. आता त्याच फॅशनला अधिक स्थिरता आणि पुन्हा वापर केला जात आहे. अशावेळी आम्ही तुम्हाला काही बेसिक गो टू आउटफिट्स आणि अक्सेसिरीज घेण्याचा सल्ला देत आहोत. जेणेकरून तुम्ही तुमचा वॉर्डरोब सोपा आकर्षक आणि स्टाइलिश ठेवू शकता. 

पांढरा शर्ट

एक पांढरा शर्टची ड्रेसिंग नेहमीच आकर्षक दिसून येते. खासकरून इंटरव्ह्यू किंवा डिनरच्या वेळी पांढरा शर्ट खूप सही दिसतो. एका (एलिगेंट वर्क अटायर) मोहक वर्क कपड्यांसाठी एक फ़ॉर्मल ट्राउज़र घाला आणि जर तुम्हाला कॅज्युअल लुक हवा असेल तर जीन्सबरोबर घाला. तुम्ही याच्या अनेक जोडी घरात ठेवू शकता, यामुळे हे ड्रेसकोड तुम्हाला कधीही कंटाळवाणा वाटणार नाही.

लिटिल ब्लॅक ड्रेस

हे एलबीडी नावाने खूप लोकप्रिय आहे. लिटिल ब्लॅक ड्रेस हा एक क्लासिक पीस आहे. फेल-प्रूफ आणि अष्टपैलू ड्रेस तुम्हाला कधीही कंटाळवाणा वाटणार नाही. फॉर्मल मीटिंग्ससाठी हे ड्रेस ज्वेलरीसोबत घाला. या दोन्ही गोष्टी आपल्याला एक आकर्षक लुक मिळविण्यासाठी मदत नक्कीच करतील.

सनग्लासेस

सनग्लासेसची एक जोडी आपल्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवी.आपल्या चेहऱ्यावरील आकारानुसार एविएटर्स, कैट-आई, ओवर-साइज़ या वेफ़रर्सनुसार सनग्लासेस तुम्ही निवडू शकता. आणि जर तुम्ही बाहेर जात असाल तर त्या सनग्लासेसला आपल्या बॅगेत ठेवण्यास विसरू नका.

व्हाईट शूज 

तुमच्या कपाटामध्ये व्हाईट शूज जरूर ठेवा आणि आपल्या डेनिम, कपड्यांसह शॉर्ट्ससह व्हाईट शूज घाला. व्हाईट शूजपेक्षा क्वचितच आरामदायक आणि दुसरे काही असेल तर तुमच्या कपड्यांशी जुळणारे रंग त्यापेक्षा चांगले कोणतेच असू शकत नाही. काही ठराविक ड्रेसिंगवर व्हाईट शूज खूप सही दिसतात. 

मनगट घड्याळ

कोणतीही ऐक्सेसरी ही आकर्षक मनगट घड्याळसोबत स्पर्धाच करू शकत नाही. कोणत्याही पोशाखसह स्टाईलिश वॉच घालणे इतर दागिन्यांना सहज मागे टाकू शकते. तुमच्या पसंतीनुसार क्लासिक मेटल किंवा लेदर बँड वॉच निवडून तुम्ही वापरू शकता. त्या वॉचला अशा ठिकाणी ठेवा जेथे तुम्ही त्यांना सहजपणे घेऊ शकता, खासकरून तुम्ही दागिने घालण्याच्या स्थितीत नसता तेव्हा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com