Beauty Tips : चेहरा उजळ अन् डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, असं कसं चालेल, या उपायांनी वाढवा डोळ्यांच सौंदर्य

Dark Circles Remedies : अनेक उपाय करुनही डार्क सर्कल तुमची पाठ सोडत नाही. तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची समस्या काही दिवसातच दुर जाईल.
Beauty Tips Dark Circles Remedies
Beauty Tips Dark Circles Remediesesakal

Beauty Tips :

प्रत्येक सुंदर स्त्रीला डार्क सर्कलसारख्या समस्येला सामोर जाव लागतं. चेहरा कितीही सुंदर, ग्लोइंग असला तर प्रत्येक तरुणीच्या डोळ्याखाली डार्क सर्कलसारखी समस्या उद्भवतेच. त्यासाठी अनेक तरुणी ब्युटी प्रोडक्ट वापरताना दिसतात. पण काहीवेळा सतत हे केमिकल युक्त प्रोडक्ट वापरून डार्क सर्कल्स अधिकच वाढतात.

डोळ्यांखाली असलेली काळी वर्तूळे घालवण्यासाठी घरातील काही गोष्टी वापरता येऊ शकतात. अनेक उपाय करुनही डार्क सर्कल तुमची पाठ सोडत नाही. तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची समस्या काही दिवसातच दुर जाईल. (Home Remedies)

Beauty Tips Dark Circles Remedies
Sweet Lemon For Beauty : मोसंबीचा असा वापर करा, चेहरा तुकतुकीत अन् केस चकचकीत झाल्याशिवाय राहणार नाहीत!

डोळ्याखाली डार्क सर्कल होण्याची अनेक कारणं आहेत. रात्री उशीरापर्यंत मोबाईल पाहणे, तणाव, पाणी कमी पिणे, पुरेशी झोप न होणे अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे ही समस्या निर्माण होते.

डोळ्याखालील डार्क सर्कल घालवण्यासाठी 7 ते 8 तासाची पुरेशी झोप गरजेची आहे. तसेच, पोषक आहाराचीही गरज आहे. यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. तसेच काही घरगुती उपायदेखील आहेत. (Dark Circles)

Beauty Tips Dark Circles Remedies
Beauty Tips : चेहरा गोरापान अन् काळी कुळकुळीत मान, हे घरगुती उपाय करा,नक्की फरक पडेल

बदाम तेल

रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेल थोडं कोमट करा आणि बोटांनी डोळ्याखाली लावून मॉलिश करा. हे तुम्ही रोज केलात तर तुमची डार्क सर्कलची समस्या दूर होईल.

काकडीचा उपयोग

काकडी तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल घालवण्यासाठी खुप फायदेशीर आहे. त्यासाठी काकडीचे 2 पातळ स्लाइस कट करा. हे दोन स्लाइस फ्रिजमध्ये 2 तासा ठेवा. गार झाल्यानंतर डोळ्यांवर 15 मिनिट ठेवा. असे केल्याने डोळ्याखालील डार्क सर्कलसोबत डोळ्यांना होणारी जळजळसुद्धा कमी होईल.

Beauty Tips Dark Circles Remedies
Wedding Beauty: लग्नाला काही दिवसच उरले आहेत, मग अशी घ्या चेहऱ्याची काळजी

कोरफड

कोरफडीचा गर  डोळ्याखाली लावल्यानंतर 5 ते 7 मिनिट मॉलिश करा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि डार्क सर्कल जाण्यास मदत होईल.

नारळाचे तेल

तुम्हाला सर्वांना माहितीय की नारळ हा बहुगुणी आहे. नारळाच्या तेलामध्ये विटामिन ई असते. हे त्वचेसाठी खुप फायद्याचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी नारळाचे तेल डोळ्याखाली लावून हलक्या हातानी मॉलिश करा.

Beauty Tips Dark Circles Remedies
Beauty Care : होम मेकर असो अथवा वर्किंग वूमन; स्वतःसाठी फक्त १०मिनिटे काढाच

आल्याचा रस

आलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. नेहमी खोकल्यावर उपयुक्त ठरणारं हे आलं डार्क सर्कल घावण्यासाठीही मदत करते. आल्याचा रस कॉटन बॉल म्हणजे कापसाने डोळ्याखाली लावा.काही दिवस असे केल्याने तुम्हाला फरक जाणवेल.

दुधाची साय

दुधाची साय चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो. त्वचेसाठी दुधाची साय फायद्याची आहे. ही तुमच्या काळ्या वर्तुळांवरही दुधाची साय चोळल्याने काळेपणा फिकट होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com