beauty tips: दसऱ्याच्या सणाला पार्लरसारखा फेशियल ग्लो मिळवा घरच्याघरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beauty tips

beauty tips: दसऱ्याच्या सणाला पार्लरसारखा फेशियल ग्लो मिळवा घरच्याघरी

सणासुदीचा हंगाम कधीच सुरू झाला आहे. म्हणूनच तुमची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी काही घरगुती पण महत्त्वाचे उपाय.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवसाचे वर्णन सण म्हणून केले जाते. खरतर ऑगस्ट महिना सुरू होताच देशभरात सणासुदीला सुरुवात होते. नवरात्री त्यात स्पेशल म्हणता येईल कारण हा पूर्णपणे बायकांचा सण असतो. आता सणासुदीचा काळ आहे, कोणत्या ना कोणत्या दिवशी सण किंवा पूजा असते, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला वेगळे आणि सुंदर दिसावे असे वाटते. त्यात दसऱ्याला तर पर्वणीच म्हणावी लागेल.या सगळ्यात ऑफिस आणि घरातील कामांमध्ये रोज पार्लरमध्ये जाणे शक्य होत नाही, त्यामुळे तुम्हाला असे काही घरगुती उपाय माहित असणे गरजेचे आहे जे तुमच्या चेहऱ्याला तजेलदार ठेवतात.

हेही वाचा: Beauty Tips : ओठांच्या काळेपणाचे मुख्य कारण लिपस्टिक असू शकते का?

पार्लरमध्ये जाणे महाग आणि वेळ घेणारे

सण आले की त्यांच्यासोबत आणखी कामंही येतात. अशा परिस्थितीत प्रदूषण, धूळ आणि तेलामुळे चेहऱ्याची चमक कमी होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया काही टिप्सद्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक कशी टिकवून ठेवू शकता. जाणून घ्या या सोप्या टिप्स.

हेही वाचा: Beauty tips : चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी असा करा टॉमेटोचा वापर

फेशियल नैसर्गिक स्क्रब वापरा

या सणासुदीच्या दिवसांमध्ये जर तुम्हाला नियमितपणे सुंदर दिसायचे असेल तर तुम्हाला फेशियल नैसर्गिक स्क्रबचा वापर करावा लागेल. जर तुम्ही दर आठवड्याला स्क्रब केले तर तुमची डेड स्किन निघून जाईल. याने चेहऱ्यावर साचलेली धूळ, घाण आणि कचरा साफ होतो. घरच्या घरी फेस स्क्रब तयार करण्यासाठी बदाम किंवा अक्रोड दह्यात मिसळा आणि आता ते चेहऱ्यावर हलके चोळा. शेवटी, थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. एका विशेष दिवसासाठी आदल्या रात्री वापरा.

हेही वाचा: Beauty Tips : चामखिळीमुळे चेहरा विद्रुप दिसतोय ; करा हा घरगुती उपाय

गुलाब पाणी वापरा

आपल्या रोजच्या कामात आपण त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत त्वचा कोरडी होते, ताजेपणा नाहीसा होतो. ते बरे करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. हे सर्वज्ञात आहे की गुलाबपाणी त्वचेसाठी अमृताचे काम करते. ते तुमच्या चेहऱ्यावर फुलांचा ताजेपणा आणि तेज आणू शकते. तुम्ही कॉटन बॉल किंवा टिश्यूने चेहऱ्यावर गुलाबपाणी लावू शकता.

हेही वाचा: Beauty Tips : ही अभिनेत्री चाळीशीतही दिसते ग्लॅमरस; काय आहे रहस्य?

पपईने फेस पॅक बनवा

पपई खाणे त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबरीने पपई चेहऱ्याला लावणे देखील खूप फायदेशीर आहे. पपईपासून बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास तुमचे सौंदर्य खुलून जाईल. पपई, दही आणि लिंबू मॅश करा आणि नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ करा. हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर चमक आणेल.