Beauty Blender Sponge वापरण्याची योग्य पध्दत माहितीये का?

तुम्हाला फ्लॉलेस मेकअप हवा असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडर वापरू शकता.
Beauty Blender Sponge
Beauty Blender Spongeesakal
Summary

तुम्हाला फ्लॉलेस मेकअप हवा असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडर वापरू शकता.

आजकाल फ्लॉलेस मेकअपसाठी ब्युटी ब्लेंडर स्पंजचा (Beauty Blender Sponge) मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. मेकअप (Makeup) ब्रशेसपेक्षा ब्युटी ब्लेंडर हे मेकअप करण्यासाठी अधिक आरामदायक आणि सोपे आहे. ज्यामुळे अनेक ब्युटी एक्सपर्ट देखील ब्युटी ब्लेंडर वापरतात. जर तुम्हाला फ्लॉलेस मेकअप हवा असेल तर तुम्ही यासाठी ब्युटी ब्लेंडर वापरू शकता. ब्युटी ब्लेंडर स्पंज देखील चेहऱ्यावर फाउंडेशन सेट करण्यासाठी योग्य मानले जाते.

Beauty Blender Sponge
Eye Makeup: लेन्स लावल्यानंतर असा करा डोळ्यांचा मेकअप

ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरल्याने, मेकअप अधिक चांगल्या प्रकारे त्वचेवर सेट होतो, परंतु उत्तम मेकअप रिजल्टसाठी, आपण ते योग्यरित्या वापरणे देखील आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचे फायदे काय असू शकतात.

फ्लॉसेस मेकअपसाठी अशा ब्युटी स्पंजचा वापर करा:

मेकअप करताना स्किन (Skin) आणि स्पंजवर कधीही फाउंडेशन लावू नका. पहिल्यांदा हातावर फाउंडेशन आणि कन्सीलर लावा. यानंतर स्पंजच्या मदतीने चेहऱ्यावर फाउंडेशन आणि कन्सीलर लावा. यामुळे फाउंडेशन आणि कन्सीलर चांगले मिसळतील आणि स्किन प्लेन होईल.

अशा प्रकारे ओव्हल ब्युटी ब्लेंडर वापरा:

मेकअप सेट करण्यासाठी जर तुम्ही अंड्याच्या आकाराचा ब्युटी स्पंज वापरत असाल तर त्यामुळे उत्तम मेकअप करता येईल. अंड्याच्या आकाराचे ब्लेंडर वापरल्याने मेकअप चांगला सेट होतो. स्पंजच्या टोकाचा वापर करून डोळ्यांखाली, ओठांच्या जवळ आणि नाकाच्या बाजूला मेकअप ब्लेंड करा. स्पंजच्या गोलाकार भागाने कपाळ आणि गालांवर मेकअप ब्लेंड करा.

Beauty Blender Sponge
तुमचा हेअर कट शॉर्ट आहे? जाणून घ्या मेकअप टिप्स

मेकअप घासून काढू नका:

मेकअप करताना हे लक्षात ठेवा की मेकअप कधीही घासू नये. मेकअपला नेहमी स्पंजने लावून घ्या. अशा पद्धतीने मेकअप लावल्याने सॉफ्ट पद्धतीने बेस तयार होतो. तसेच, मेकअप त्वचेत चांगला अब्जॉर्ब केला जातो, ज्यामुळे घाम आल्यावरही मेकअप खराब होत नाही. स्पंजने मेकअप लावल्याने मेकअप बराच काळ चेहऱ्यावर टिकून राहतो.

हलके ओले स्पंज वापरा:

मेकअप करताना स्पंज जास्त ओला नसावा. खूप ओले स्पंज मेकअप योग्यरित्या सेट करत नाही. फ्लॉसेस मेकअप लूकसाठी, स्पंज ओला करा आणि सर्व पाणी पिळून घ्या. यानंतर स्पंजने चेहऱ्यावर मेकअप लावा. तसेच यावेळी ड्रायस्पंज देखील वापरू नये. ड्राय स्पंज वापरल्याने मेकअप नीट मिसळा (ब्लेंड) होत नाही.

मेक-अप लावल्यानंतर ते स्वच्छ करणे आवश्यक:

मेकअप केल्यानंतर ब्युटी ब्लॅडर स्पंज साफ करणे फार महत्त्वाचे आहे. खराब झालेला स्पंज वापरल्याने स्कीन अॅलर्जी आणि पिंपल्स होऊ शकतात. म्हणून, मेकअप लावल्यानंतर, कोमट पाण्यात शॅम्पू घालून तुम्ही स्पंज स्वच्छ करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com