Gulkand Benefits: गुलकंद मुळे तुमचा चेहरा उजळेल, गुलकंदाचे चेहऱ्यासाठीचे हे फायदे माहित आहेत का..

गुलकंद हे केवळ खाण्यासाठी असतं असं तुम्हाला वाटत असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला गुलकंदाचे त्वचेसाठी असलेले काही फायदे सांगणार आहोत
गुलकंदाचे फायदे
गुलकंदाचे फायदेEsakal
Updated on

दिसायला आकर्षक आणि सुवास देणाऱ्या गुलाबाच्या फुलाचे आपल्या त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गुलाब पाण्याच्या वापराने त्वचेला थंडावा मिळतो.

गुलाबाच्या पाकळ्यांचे अनेक उपयोग आहेत. रोज वॉटरचा Rose Water स्वयंपाकात तसंच सरबतमध्ये वापर केला जातो.

तसचं विविध फेस पॅकसाठी Face Pack देखील गुलाब पाणी वापरणं फायदेशीर ठरतं. Beauty Tips Marathi advantages of Gulkand Rose Petals conserve for face

 तर दुसरीकडे वाळलेल्या गुलाब पाकळ्यांचा Rose Petals Conserve विविध स्विट डीशमध्ये स्वाद वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. यासोबतच गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात आलेल्या गुलकंदाची Gulkand चव तर अनेकांना आवडत असेलच. जिभेची चव वाढवणाऱ्या या गुलकंदाचे देखील त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. 

आयुर्वेदानुसारही गुलाबाचे अनेक फायदे आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे शरीर डिटॉक्स करण्यासोबत अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. गुलकंद हे केवळ खाण्यासाठी असतं असं तुम्हाला वाटत असेल.

मात्र आज आम्ही तुम्हाला गुलकंदाचे त्वचेसाठी असलेले काही फायदे सांगणार आहोत. होय गुलकंद त्वचेवर लावल्याने देखील अनेक फायदे होतात.  तेव्हा जाणून घेऊयात गुलकंदाचे त्वचेसाठी फायदे आणि ते वापरण्याचे मार्ग

Acneसाठी गुलकंद स्क्रब

चेहऱ्यावरील एक्सेची समस्या दूर करण्यासाठी गुलकंद स्क्रब लावणं अनेक प्रकारे गुणकारी ठरू शकतं. गुलकंद अँटी-बॅक्टेरियल असल्याने त्वचेवरील बॅक्टेरियल इंफेक्शन कमी होऊन पुळ्या कमी होवू शकतात.

तसचं चेहऱ्यावरील डेड स्किन काढून चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी गुलकंद मदत करत. गुलकंदमध्ये थोडं चंदन आणि लिंबाचे काही थेंब टाकून ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी.  चेहरा चांगला स्क्रब करावा त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. 

हे देखिल वाचा-

गुलकंदाचे फायदे
Summer Health Care : उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंद खा अन् निरोगी राहा, लगेच नोट करा रेसिपी

गुलकंद आणि दूधाचा फेसपॅक

गुलकंदमध्ये दूध मिसळून ते चेहऱ्याला लावल्यास पिग्मेंटेशनची समस्या दूर होते. यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढण्यासही मदत होते आणि चेहरा उजळतो. गुलकंदामध्ये चमचाभर कच्च दूध मिसळून चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करावं. थोडा वेळ ठेवून चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे फरक जाणवेल.

डार्क सर्कल्स कमी करेल

डार्क सर्कलमुळे अनेकजण चिंतेत असतात. या डोळ्या भोवतीच्या काळ्या वर्तुळांमुळे अनेकदा चेहऱ्याच्या सौदर्यावर प्रभाव पडतो.  अशा वेळी गुलकंद तुमच्या उपयोगी येऊ शकतं. गुलकंद थोडं पाण्यात मिसळावं. त्यानंतर दोन कापसाचे बोळे यात भिजवून ते डोळ्यांखाली ठेवावे.

रोज रात्री १० मिनिटांसाठी हे गुलकंदामधील कापसाचे बोळे डोळ्या खाली ठेवल्यास डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल. याशिवाय गुलाबाच्या पाकळ्यांचे तसेच गुलकंदचे त्वचेसाठी काही इतरही फायदे आहेत. 

  • गुलकंद हे थंड प्रवृत्तीचं असतं त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. गुलकंदामुळे त्वचेवरील जळजळ कमी होण्यासही मदत होते. यामुळेच उन्हाळ्यात त्वचेसाठी गुलकंदाचा वापर उपयुक्त ठरू शकतो.

  • गुलकंद त्वचेचा ड्रायनेस म्हणजेच कोरडेपणा कमी करण्यास मदत करतं. यामुळे चेहरा हायड्रेट राहतो.

  • डार्क सर्कलसोबतच गुलंकंदामुळे डोळ्या खालची सूज कमी होण्यासाठी देखील मदत होते. 

  • गुलकंद चेहऱ्यासाठी टोनर म्हणूनही करणं शक्य आहे. यामुळे तुमच्या त्वचेचा pH बॅलेन्स राखण्यास मदत होईल. एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही गुलाब पाणी आणि काही वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून या पाण्याने चेहऱ्यावर स्प्रे केल्यास चांगला फायदा होईल. 

  • चेहऱ्यावर गुलकंद लावल्याने टॅनिंग कमी होण्यास मदत होते. चेहरा तसचं गळ्याभोवतीचा काळेपणा कमी करण्यासाठी गुलकंद उपयुक्त आहे. मुरुम किंवा पिम्पल्स मुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग फिके करण्यासाठी आणि चेहरा उजळण्यासाठी गुलकंद फायदेशीर आहे. 

गुलकंद चेहऱ्याला लावण्यासोबत गुलकंदाच्या सेवनामुळे देखील त्वचेला फायदे होतात. गुलकंद रक्त शुद्धीकरणाचं काम करत. यासाठी रोज सकाळी गुलकंदाचं पाणी प्यावं.यामुळे चेहऱ्याला आतून पोषण मिळेल आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com