esakal | चेहऱ्याची रंगत वाढवण्यासाठी जीऱ्याचे स्क्रब आणि फेस पॅक वापरा

बोलून बातमी शोधा

चेहऱ्याची रंगत वाढवण्यासाठी जीऱ्याचे स्क्रब आणि फेस पॅक वापरा
चेहऱ्याची रंगत वाढवण्यासाठी जीऱ्याचे स्क्रब आणि फेस पॅक वापरा
sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : जर तुमच्या चेहऱ्यावरील उजळपणा कमी झाला असेल तर घरातील जीरेपासून स्क्रब पाणी फेस पॅक तयार करा. हे फेस पॅक तयार करण्याची अत्यंत  सोपी पद्धत आहे. खाण्याचे विविध पदार्थ आणि जीरा यांचे एक अतूट नाते आहे. जिरे हे खाद्यपदार्थांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच प्रत्येकांच्या स्वयंपाक घरात जिरा हा अविभाज्य घटक आहे.

खास करून भारतीय खाद्यपदार्थांमध्ये जिर्‍याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे खाद्य पदार्थ अत्यंत स्वादिष्ट होतात. त्याचबरोबर आरोग्यासाठीही हा घटक फायदेशीर ठरतो. परंतु जिरा हे आपल्या सौंदर्यासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकते. जिरे हे आपल्या शरीराच्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी  ही अत्यंत फायदेशीर आहे. चेहऱ्याचा रंग, चेहऱ्यावरील पुटकुळे तसेच चेहऱ्यावरील टॅनिंग हटवण्यासाठी जिर्‍याचा  वापर केला जातो. आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिर्‍याचा माध्यमातून स्क्रब आणि फेसपॅक कशा पद्धतीने बनवले जाते आणि त्याचे फायदे सांगणार आहोत.

स्क्रब बनवण्याची पद्धत

जिर्‍यापासून स्क्रब बनवणे अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. एका बाऊलमध्ये जिरा पावडर घेऊन त्यात ट्री ऑइल, मध, साखर आणि बदामाचे तेल घाला. त्यानंतर ते चांगल्या पद्धतीने मिक्स करा. हे मिश्रण धाग्यासारखे होईल असे पहा. त्यानंतर ते चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा हलवून थंड जागी ठेवा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर स्क्रब प्रमाणे तुम्ही याचा वापर करू शकता. परंतु हे स्क्रब वापरताना डोळ्याजवळ जाणार नाही याची काळजी घ्या.या क्रीमचा वापर आपण हात पाय तसेच मानेवर सुद्धा करू शकता.

फेस बॅक बनवण्याची पद्धत

जिरेपासून बनवलेल्या फेस पॅक मुळे आपली त्वचा अधिक उजळ होते. हे तयार करण्यासाठी जीरा पावडर मध्ये थोड्या प्रमाणात मध आणि हळद मिक्स करा. त्यानंतर जिऱ्याचे फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि ते पूर्णपणे सुकू द्या. फेस पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. या फेस पॅक मुळे आपली त्वचा चमकदार आणि मऊ बनते.

त्वचेसाठी जिऱ्याचे फायदे

जिऱ्यामध्ये डायट फायबर मोठ्या प्रमाणात असतात. हे त्वचा स्वच्छ करण्यासाठी तसेच त्वचेवरील टॉक्सिन दूर करण्यासाठी मदत करते.जिरे हे अँटी एजिंग म्हणून काम करते यामुळे आपली त्वचा नेहमीच तारुण्य सारखे दिसते. जिऱ्याचे स्क्रब तसेच फेस पॅक हे त्वचेवरील तेलकटपणा कमी करते. यामुळे चेहऱ्याची रंग अधिक उजळून दिसते. जिऱ्यात असलेले अँटीबॅक्टरियल आणि अँटीअक्सिडेंट त्वचेची देखभाल करते