Wedding Special : लग्न ठरल्यानंतर तरुणींनी अशी घ्यावी त्वचेची आणि केसांची काळजी

लग्न ठरले की कार्यालय बुक करण्याबरोबरच हल्ली ब्यूटी थेरपिस्टही लगेच बुक करावा लागतो, कारण लग्नाच्या सीझनमध्ये सगळेच ब्यूटी थेरपिस्ट व्यग्र असतात.
Wedding Special
Wedding Specialesakal

(लेखिका - स्वप्ना साने)

Wedding Special : कपडे आणि मेकअपच्या बाबतीत, ट्रेंड कोणताही असला तरी तुम्हाला तो शोभून दिसतोय का, हे लक्षात घ्यावे. बरेचवेळा तरुणींना कुठल्यातरी सेलिब्रिटीसारखा लुक हवा असतो, म्हणून त्या स्वतःसाठीही त्यांच्या वेडिंग गाऊन किंवा लेहेंग्यासारखा ड्रेस घेतात आणि त्याचप्रमाणे मेकअपही हवा असतो. पण अनुकरण करणे सोपे आहे, पण ते शोभून दिसले नाही तर पंचाईत व्हायची.

लग्न ठरले की कार्यालय बुक करण्याबरोबरच हल्ली ब्यूटी थेरपिस्टही लगेच बुक करावा लागतो, कारण लग्नाच्या सीझनमध्ये सगळेच ब्यूटी थेरपिस्ट व्यग्र असतात. ब्यूटी थेरपिस्टबरोबर चर्चा करून लग्नासाठी, आणि लग्नाआधीच्या व नंतरच्या कार्यक्रमांसाठी कोणता लुक असावा हे आधीच ठरवले जाते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्यावेळचा मेकअप, हेअरस्टाइल वगैरे आधीच ठरले असले, तरी काही गोष्टींची आधीपासूनच काळजी घ्यायला हवी. त्यासंदर्भात काही टिप्स

Wedding Special
HD Makeup : ब्राईडसाठी परफेक्ट असणारा HD मेकअप काय आहे? याचे प्रमुख प्रकार घ्या जाणून

आहार सांभाळणे महत्त्वाचे

लग्नाच्या काही दिवस आधीपासून वधू-वर दोघांनीही डाएटकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांनी बाहेरचे खाणे टाळावे. न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेऊन डाएट प्लॅन करून घ्यावे. आपण जे काही खात असतो, ते जर हेल्दी नसेल तर शरीरात टॉक्सिन वाढतात, त्वचेवर नॅचरल ग्लो दिसत नाही, त्वचा निस्तेज दिसायला लागते; असे होऊन नये यासाठी डाएट प्लॅन करावे.

हल्ली लग्न ठरल्यापासून ते लग्नसोहळा पार पडेपर्यंत केळवणांबरोबरच सतत मुला-मुलींच्या पार्ट्या सुरू असतात. पार्ट्या जरूर कराव्यात, पण काय खायचे प्यायचे ते आपण ठरवायचे. थोडी शिस्त पाळल्यास फायदा आपल्यालाच होणार हे वधू-वरांनी लक्षात घ्यावे.

त्वचा आणि केसांची काळजी

डाएटबरोबरच स्किन ॲण्ड हेअर केअर सेशनही प्लॅन करावेत. दोघांनीही आपल्या ब्यूटी कन्सल्टंटशी चर्चा करून स्किन हेल्दी आणि ग्लोइंग दिसण्यासाठी काय करावे लागेल, याचे प्लॅनिंग करावे व त्याप्रमाणे सेटिंग घ्याव्यात. डाएटसोबतच त्वचेची काळजी घेतली, तर आणखी चांगला इफेक्ट जाणवतो.

जर पिंपल आणि पिगमेन्टेशनसारखा प्रॉब्लेम असेल तर त्याच्या आधीपासून सेटिंग घ्यायला हव्यात. शिवाय तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे होम केअरही जरूर फॉलो करावी. त्वचेसोबतच केसांनासुद्धा हेअर स्पा आणि डीप कंडिशनिंगच्या सेटिंगची गरज असेल तर जरूर करावे. केसांना हायलाइट केले असतील तर नीट स्पा करून केस ट्रिम करून घ्यावेत. लग्नासाठीची हेअर स्टाइल आधी ट्राय करून बघावी.

तुमच्या ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करून घ्यावेत. यासोबतच लग्न ठरल्यानंतर महिन्यातून एकदा तरी बॉडी पॉलिशिंगचे सेशन करावे. शक्य असल्यास स्ट्राँग साबण आणि बॉडी वॉशचा वापर टाळावा. त्याऐवजी आयुर्वेदिक उटणे वापरावे.

फेशियल हेअर जास्त असल्यास आणि ते लेझर ट्रीटमेंटने काढायचे असल्यास, त्यासाठी खूप आधीपासून सेटिंग घ्याव्यात. कारण ह्या ट्रीटमेंट ऐनवेळी करण्यासारख्या नाहीत. तात्पुरती प्रोसेस करायची झाल्यास थ्रेडिंग अथवा वॅक्सिंगने फेशियल हेअर काढू शकता.

ब्यूटी किट

डाएट, स्किन आणि हेअर केअरच्या बरोबरीने वधू-वर दोघांनीही आपली ब्यूटी किट रेडी करून ठेवावी. त्यात सीटीएम - क्लीन्सिंग, टोनिंग, मॉइस्चरायझिंग प्रॉडक्ट, इतर लागणाऱ्या वस्तू, शेविंग किट, सन स्क्रीन, मेकअप किट, सेफ्टी पिन्स, वेट वाईप इत्यादी वस्तू आवश्यकतेनुसार किटमध्ये भरून ठेवाव्यात.

मेकअप

मेकअप संदर्भात मेकअप आर्टिस्टशी आधीच चर्चा करा. सध्याच्या ट्रेंडप्रमाणे मेकअप हवा असेल तर त्यानुसारच कपडेही निवडावेत. किंवा कपडे आधी घेऊन झाले असतील तर ते आर्टिस्टला दाखवून त्याप्रमाणे मेकअपसाठी कलर चॉइस करायला सांगावा. मेकअपचा ट्रेंड कोणताही असला, तरी तुम्हाला तो सूट होतोय का आणि तुमच्या आउटफिटला तो मेकअप शोभून दिसेल का, हेही लक्षात घ्यावे.

बरेचवेळा मुलींना कुठल्यातरी सेलिब्रिटीसारखा लुक हवा असतो, म्हणून त्यांच्या वेडिंग गाऊन किंवा लेहेंग्यासारखा ड्रेस त्या स्वतःलाही घेतात आणि त्याचप्रमाणे मेकअपही हवा असतो. आपल्या आवडत्या हिरॉईनचा लुक आपणही करावा असे वाटणे स्वाभाविक आहे, मात्र तुम्हाला तो कितपत शोभून दिसेल ह्याचे भान जरूर ठेवावे, असे आवर्जून सांगावेसे वाटते. कारण अनुकरण करणे सोपे आहे, पण ते शोभून दिसले नाही तर भलतेच काही तरी व्हायचे.

हळदीचा पॅक

लग्नाच्या विधींमध्ये आपल्याकडे हळद लावणे आणि हळद खेळणे हासुद्धा एक मोठा सोहळा असतो. हळद जरी औषधी गुणांची असली, तरी कधीकधी एखाद्याला त्यात असलेल्या काही घटकांमुळे त्वचेवर त्रास जाणवू शकतो. किंवा हळदीमध्ये जर काही भेसळ असली, तर त्यामुळे त्वचेवर रॅश येऊ शकतो. कधी तर असेही होते की हळदीच्या रंगाचे पॅच राहतात आणि त्यावर मेकअप नीट बसत नाही.

हळदीमध्ये कृत्रिम रंगाचा वापर केल्यामुळे असे होते अन् त्याचाही त्वचेला त्रास होतो. म्हणूनच नवरी मुलगी आणि नवरा मुलगा यांच्याबरोबरच इतरांच्याही त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून ऑरगॅनिक हळद वापरावी. ती ‘पॅक’ स्वरूपात तयार करावी, असे मी सुचवेन. ४ मोठे चमचे मुलतानी माती घेऊन त्यामध्ये २ मोठे चमचे चंदन पावडर आणि २ मोठे चमचे ऑरगॅनिक हळद घालावी. त्यात २ मोठे चमचे बदाम तेल तसेच गुलाबजल घालून पेस्ट तयार करावी.

त्यात रोझ इसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाकावेत. ताज्या देशी गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ करून त्यांचे बारीक तुकडे करून ह्या हळदी-चंदनच्या पेस्टमध्ये घालावेत. खूपच छान सुवासिक आणि औषधी गुणयुक्त हळद तयार होते, ज्यामुळे नवऱ्या मुलीची त्वचा उजळून निघेल अन् रॅश वगैरेची भीती राहणार नाही.

Wedding Special
Pineapple Face Packs : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अननसाची घ्या मदत, बनवा ‘हे’ फेसपॅक्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com