Belly Fat Weight Loss: पोट इतकं सुटलंय की लपवणं कठीण झालंय? घरगुती मसाल्याच्या मदतीने अशी वितळवा चरबी

भातात आलेला हा मसाला तुम्ही अलगद उचलून बाहेर टाकता
Belly Fat Weight Loss
Belly Fat Weight Lossesakal

Belly Fat Weight Loss:

आपल्या घरात अनेक प्रकारचे मसाले आहेत. त्यापैकी एक मसाला जेवणाची, पुलाव, बिर्याणीची चव इतकी वाढवतो की विचारू नका. पण तो मसाला ताटात आला तर अलगद उचलून बाजूला केला जातो. त्या नाव आहे तमालपत्र. (Bay leaf Water For Weight Loss)

मसाले भात असो वा शाही पुलाव सगळ्याच भातात हा मसाला असतोच. तमालपत्राचा सुगंध बिर्याणीला वेगळी चव आणि स्वाद देतो. हाच मसाला तुमच्या अनेक प्रकारे मदतीला येतो. तमालपत्रात केवळ स्वाद नाहीतर पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम हे गुणधर्मही असतात. (Weight Loss Tips)

Belly Fat Weight Loss
Weight Loss Diet : वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे मेथी, पण कडवट मेथी खावी कशी?

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे. ज्यांना यासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर करायचा आहे, अशांनी तमालपत्राचा आहारात समावेश करावा. आजकाल बैठे काम करणाऱ्या लोकांना ढेरी वाढण्याचा त्रास होत आहे. त्यामुळे, त्यांनीही तमालपत्र खायला सुरूवात केली तर ढेरी हळूहळू कमी व्हायला लागेल. तर हा मसाला कसे काम करतो, आणि तो आपल्या रोजच्या आहारात कसा वापरायचा हे पाहुयात. (Spices)

Belly Fat Weight Loss
Weight Loss Fruits : वजन कमी करण्यासाठी डायट करताय तर खा ही फळे, लगेच फरक जाणवेल

डिटॉक्स ड्रिंक

वजन कमी करण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत. ते जेव्हा याबद्दल माहिती घ्यायला सुरूवात करतात. तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे वजन लवकरात लवकर कमी होण्यासाठी सकाळी उठल्यावर डिटॉक्स ड्रिंक प्यावे. त्यासाठी तमालपत्र पाण्यात उकळून हे पाणी कोमट करून प्यायल्याने फरक पडतो. (Weight Loss Diet) 

हे पाणी गाळून हळू हळू प्या. जर तुम्हाला त्याची चव आवडत नसेल तर तुम्ही त्यात मध देखील वापरू शकता.

Belly Fat Weight Loss
Weight Loss Diet : वजन कमी करण्यासाठी इतकं तर केलंच पाहिजे, हा आहे हेल्दी डायट प्लॅन

तमालपत्राचा चहा बनवा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी, तुम्ही तमालपत्र चहा तयार करून पिऊ शकता. या चहामध्ये लिंबाचा रस घालता येतो. रिकाम्या पोटी या चहाचे सेवन केल्याने केवळ लठ्ठपणा कमी होत नाही तर पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते.

वजन कमी करणाऱ्या लोकांनी सर्वात आधी हे लक्षात घ्यायला हवं की, वजन कमी होणे ही काही लगेच होणार कृती नाही. त्यासाठी, अनेक दिवस जावे लागतात. जसे वजन लगेच वाढत नाही तसे ते कमीही होत नाही. त्यामुळे तमालपत्राच्या या मसाल्याचा वापर योग्यरित्या करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com