esakal | आंबट-गोड चिंच आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची; जाणून घ्या फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

tamarind

आंबट-गोड चिंच आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची; जाणून घ्या फायदे

sakal_logo
By
स्वाती वेमूल

चिंच Tamarind म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आंबड-गोड चिंचेचा वापर चटणी, सॉस बनवताना केला जातो. इतकंच नव्हे तर दाक्षिणात्य पद्धतीची डाळ बनवताना किंवा ठराविक मिठाईचे पदार्थ बनवतानाही चिंचेचा वापर केला जातो. चिंचेच्या वापराने पदार्थाला एक वेगळीच चव प्राप्त होते. दैनंदिन खाद्यपदार्थात चिंचेचा वापर केल्यास त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत. चिंचेमधील अनेक पौष्टिक घटक हे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून संरक्षण करतात. लोह, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए यांसारखे पोषक घटक चिंचेत असतात. चिंच खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.. (benefits of including tamarind or imli in your diet slv92)

- चिंचेमध्ये लोह अधिक प्रमाणात असते. त्यामुळे चिंचेचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो.

- चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासही मदत होते.

- चिंचेमध्ये हाइड्रोसिट्रिक अॅसिड असल्याने, शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

- रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित करण्यासाठीही चिंच फायदेशीर असते.

- लोह आणि पोटॅशियमचं प्रमाण अधिक असल्याने ब्लड प्रेशर नियमित करण्यासाठीही चिंच फायदेशीर आहे.

- प्राचीन काळापासून चिंचेचा वापर हा पाचक रुपात केला जातो. चिंचेच्या सेवनाने पोटाशी संबंधित विकार दूर होतात.

हेही वाचा: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' ५ भाज्या

चिंच खाण्याआधी ही गोष्ट लक्षात ठेवा

ज्यांना चिंचेची अॅलर्जी आहे, अशा लोकांनी चिंच खाऊ नये. चिंचेचं सेवन करताना त्याचं प्रमाण अधिक असू नये. योग्य प्रमाणातच चिंचेचं सेवन करावं.

loading image