esakal | पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' ५ भाज्या
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetable

पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' ५ भाज्या

sakal_logo
By
शर्वरी जोशी

पावसाळा सुरु झाला की बाजारामध्ये अनेक रानभाज्या आणि पालेभाज्या दिसू लागतात. या दिवसांमध्ये भाज्या ताज्या मिळत असल्यामुळे प्रत्येक गृहिणीचा कल पालेभाज्या खरेदी करण्यावर असतो. त्यातही मेथी, पालक, करडई, शेपू या भाज्या आवर्जुन घेतल्या जातात. मात्र, या दिवसांमध्ये पालेभाज्या शरीरासाठी जितक्या फायदेशीर आहेत. तशाच काही भाज्या या आरोग्यासाठी घातकही आहेत. अनेक भाज्या खाल्ल्यामुळे इंफेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळेच पावसाळ्यात कोणत्या पालेभाज्या खातांना खबरदारी घ्यावी हे पाहुयात. (5-vegetable-should-not-eat-in-rainy-season)

१. पालक -

शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी पालक अत्यंत गरजेचा आहे. तसंच पालकामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते असं म्हटलं जातं. परंतु, या काळात पालकावर अनेक सूक्ष्म अळ्या किंवा किडे असण्याची शक्यता असते. पालक कितीही हिरवागार असला तरीदेखील त्याच्या पानांवर पांढऱ्या पिवळसर रेषा किंवा डाग असतील तर तो पालक खरेदी करु नये. या डागांच्या आतमध्ये सूक्ष्म अळ्या निघण्याची शक्यता असते.

हेही वाचा: पोस्ट कोविड लक्षणे असल्यास बाळाला स्तनपान करावे का?

२. कोबी -

पावसाळ्यात कोबीच्या मोठ्या गड्ड्या बाजारात पाहायला मिळतात. मात्र, कोबी आतपर्यंत चांगला आहे की नाही याची खात्री करुन घ्या. अनेकदा कोबी वरुन चांगला दिसतो. मात्र, त्याच्या आतमध्ये कीड लपलेली असते. त्यामुळे जर कोबीची पानं वरुन कुरतडल्यासारखी वाटत असतील तर तो कोबी घेऊ नका. तसंच कोबी खरेदी केल्यावर कधीही घरी आल्यावर तो मीठाच्या पाण्यात काही वेळ ठेवा. त्यामुळे कोबीत एखादी कीड असेल तर ती लगेच बाहेर येईल.

३. वांगी-

पावसाळ्यात गरमागरम भाकरी आणि झणझणीत वांग्याचं भरीत हा बेत हमखास प्रत्येक घरी होतो. मात्र, या दिवसामध्ये वांगीदेखील नीट पाहून खरेदी करा. कारण वांग्याच्या आत बारीक कीडे असण्याची शक्यता असते. एकदा ही कीड वांग्याला लागली की संपूर्ण वांग खराब होतं. अनेक जण किडलेला भाग काढून इतर चांगला भाग वापरतात. मात्र, चुकूनही तो भाग घेऊ नका. कारण, ही सूक्ष्म कीड वांग्याच्या संपूर्ण भागात पसरले असतात.

हेही वाचा: पावसाळ्यात घ्या बाळाच्या त्वचेची काळजी

४. टोमॅटो -

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनशक्ती मंदावली असते. त्यामुळे टोमॅटोचं सेवन कमी करावं. त्यातच टोमॅटोमध्ये काही क्षारयुक्त घटक असतात ज्यांना वैज्ञानिक भाषेत अॅल्कालॉयड्स असं म्हटलं जातं. कीड,आळ्यांपासून पिकांचं संरक्षण व्हावं यासाठी ते झाडांवर फवारलं जातं. याचे काही अंश टोमॅटोमध्येही गेले असतात. हे एक प्रकारचं विषारी केमिकल असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात टोमॅटो कमी खावेत. प्रमाणापेक्षा जास्त टोमॅटो खाल्ले तर त्वचाविकार निर्माण होण्याची शक्यता असते.

५. मशरूम -

पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो मशरुमचं सेवन करुच नये. मशरुम प्रदुषित ठिकाणं आणि वातावरणात तयार होत असतात. तसंच मशरुमच्या काही प्रजाती या विषारी असतात. त्यामुळ पावसाळ्याच्या दिवसात मशरुम खाणं टाळावं.

loading image