Bhau Beej Gifts 2023: भाऊबीज निमित्त बहिणीला 'या' खास भेटवस्तू द्या, सणाचा आनंद द्विगुणित करा

भाऊबीजेला बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, याचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला काही भेटवस्तू सूचवत आहोत.
Bhau Beej
Bhau Beej sakal

भारतीय सण धार्मिक मान्यतांवर तर आधारित आहेतच, पण त्याचबरोबर प्रत्येक सणांना कुटुंब, नाती, प्रेम यांची देखील किनार आहे. कुटुंब कोणत्याही सणाच्या निमित्ताने मिळून सण साजरा करतात. असाच दिवाळीत साजरा केला जाणारा सण म्हणजेच भाऊबीज. 

हा दिवाळीतला चौथा आणि शेवटचा दिवस असतो. यावर्षी भाऊबीज यावर्षी 15 नोव्हेंबरला आहे. भाऊबीज हा भावाने बहिणीबद्दल आणि बहिणीने भावाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा सण असतो. बहिण भावाला समर्पित असणारा हा सण असतो. 

या खास दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याला ओवाळते तर भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि प्रेम म्हणून छान भेटवस्तू देतो. तुम्हालाही या वर्षी बहिणीला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडला का? मग हे वाचाच.

बहिणीला तुम्ही एकापेक्षा एक भारी गिफ्ट देऊ शकता. त्यातील निवडक गिफ्ट जाणून घ्या.

Bhau Beej
Diwali 2023: लक्ष्मी पूजनसाठी वेगळा लूक हवाय? हे इअर रिंग्स नक्की ट्राय करुन पाहा

मेकअप किट 

जर तुमच्या बहिणीला मेकअपची आवड असेल तर तुम्ही तिला मेकअप किट देऊ शकता. बहूदा मुलींना मेकअपची आवड असते. मेकअप किट देताना तिचा आवडता प्रोडक्ट किंवा ब्रँड कोणता, हे जाणून घ्या.

ज्वेलरी

जर तुमच्या बहिणीला ज्वेलरी आवडत असेल तर तुम्ही भाऊबीजेला तिला ज्वेलरी गिफ्ट करू शकता. ज्वेलरीमध्ये बरेच ऑप्शन असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार गिफ्ट करू शकता.

कपडे

मुलींना कपडयांची खूप आवड असते. त्यामुळे त्यांच्या आवडत्या रंगाचा ड्रेस किंवा साडीही तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता. शिवाय सध्या ट्रेन्ड्स मध्ये असलेले ड्रेसही तुम्ही तिला गिफ्ट करू शकता.

वॉलेट

प्रत्येक मुलीच्या बॅगमध्ये वॉलेट असते. त्यामुळे या भाऊबीजेला तिला नव्या स्टाईलचे वॉलेट किंवा पर्स गिफ्ट करुन तुम्ही तिला खूश करू शकता.

सबस्क्रिप्शन

जर तुमची बहिण ओटीटी प्लॅटफॉर्मची फॅन असेल तर तुम्ही तिला कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

हेडफोन्स

जर तुमच्या बहिणीकडे हेडफोन्स नसतील तर तुम्ही या भाऊबीजेला तुमच्या बहिणीला आवडत्या कंपनीचे हेडफोन्सही गिफ्ट देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com