Bike Tips and Tricks: बाईक चालवताना हेल्मेट घालण्यासोबतच 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Bike Tips: बाईक चालवताना हेल्मेट घालण्यासोबतच अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता नाही.
Bike Tips and Tricks:
Bike Tips and Tricks:Sakal
Updated on

Bike Riding Tips: अनेक लोकांना बाईक चालवायला खुप आवडते. मोटारसायकलची एक वेगळीच क्रेझ लहान वयातील मुलांमध्ये दिसून येते. त्यांना लहानपणापासूनच बाईक चालवायला शिकायची इच्छा असते.

तसेच आजकाल मुलींमध्ये बाइक चालवण्याची आवड दिसून येते. एक चांगला बाईक रायडर तो असतो जो सर्व नियमांचे पालन करून सहजपणे बाइक चालवतो. तसेच दुचाकी चालवताना काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी सुरुवातीलाच मोटारसायकल चालवायला शिकताना सर्व नियम-कायदे माहीत असायला हवेत.

बाईक चालवताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण ती चालवणे इतके सोपे नाही. पण ते फार कठीण आहे असे नाही. बाईक चालवण्याचा सराव करून, एखादी व्यक्ती अधिक चांगली बाईक चालवू शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला कोणत्याही अपघातापासून वाचता येईल. बाईक चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी इतर कोणत्या गोष्टींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊया.

दोन बोट क्लचवर ठेवावे

नेहमी बाईक चालवताना क्लच लीव्हरचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे. रायडरने क्लचवर दोन बोटे ठेवली पाहिजेत. पण, जर तुम्ही चारही बोटांनी क्लच चालवत असाल तर यातही काही अडचण नाही.

आजकालच्या बाइक्समध्ये क्लच लीव्हर खूप हलका बनवला जातो. कारण ते फक्त एक किंवा दोन बोटांनी सहज नियंत्रित करता येईल. पण, एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, जर तुमच्या बाइकचा क्लच योग्य नसेल, तर तुम्ही बाइक चालवणे टाळावे.

Bike Tips and Tricks:
Electric Bike Care: उन्हाळ्यात ई-वाहने वापरताना पाळा सुरक्षेची पंचसूत्री

दुचाकी डावीकडे व उजवीकडे वळवण्याचा सराव करा

पाहिले तर उजवीकडे वळण घेण्यापेक्षा बाईक डावीकडे वळणे सोपे आहे. यामागे दोन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे बहुतेक लोक उजव्या हाताचे असतात, ज्यामुळे हँडल बार डावीकडे वळवणे सोपे होते. दुसरं कारण म्हणजे बाईकचा मागचा ब्रेक लीव्हर उजवीकडे आहे, त्यामुळे उजवीकडे वळण घेताना पाय खाली ठेवणं आणि ब्रेक लावणंही कठीण होतं. या कारणास्तव, रेसिंगमध्येही, पहिले वळण डाव्या हाताला ठेवले जाते, जेणेकरून रायडर बाइकवर आणि ब्रेकवर योग्य संतुलन राखू शकेल.

हार्ड ब्रेक लावण्याची सवय

बाईक चालवताना कधीही ब्रेक लावण्याची गरज पडू शकते. यासाठी हार्ड ब्रेक लावण्याचा सराव करावा. यासाठी मोकळ्या जागेत किंवा रिकाम्या पार्किंगमध्ये सराव करावा. यामुळे तुम्ही तुमची बाईक लगेच थांबवण्यासाठी किती वेळ घेऊ शकता ते समजण्यास मदत होते.

या सर्व गोष्टींबरोबरच लेन पोझिशनिंग योग्य असायला हवे. लेन पोझिशनिंग योग्य असणे आवश्यक आहे. तसेच, बाईक चालवताना, कोणत्या दिशेने जायचे आहे याकडे लक्ष द्या. बाऊक चालवताना तुमचे लक्ष रस्त्यावरून विचलित होऊ देऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.